Skip to main content

जीवनमान

मेळघाट ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 27/11/2019 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)
काव्यरस

अर्ज है की..

लेखक आजी यांनी मंगळवार, 26/11/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक अर्ज भरत होते. तो इतका किचकट होता की,तो भरता भरता माझी दमछाक होत होती. संपूर्ण नाव, पत्ता-घरचा, पत्ता-ऑफीसचा, तात्पुरता, कायमचा. मग फोन नंबर. घरचा, ऑफीसचा, लँडलाईन, मोबाईल. मग पतीचे संपूर्ण नाव,ऑबलिक/पित्याचे संपूर्ण नाव. आईचे माहेरचे, सासरचे संपूर्ण नाव. आधार नंबर, पॅन नंबर.. मसणं नि माती. सतराशे साठ चौकशा. हा अर्ज फाडून टाकून, पेन फेकून देऊन, बाणेदारपणे घरी निघून जावं आणि मस्तपैकी एसी लावून झोपून जावं असा विचार मनात आला. पण तसं करणं शक्य नव्हतं. अर्ज भरणं भाग होतं. त्यात माझाच फायदा होता. असं नेहमीच होतं.अर्जाचा फॉर्म भरायचा मला नेहमीच कंटाळा येतो. बँकेत जा, अर्ज.

कठीण कठीण...किती (उत्तरार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 25/11/2019 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis) : उत्तरार्ध पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45731#new ................... मागील भागात आपण या आजाराची कारणमीमांसा पाहिली. बऱ्याच रुग्णांत हा आजार दीर्घकालीन होतो. आता एक मुद्दा ध्यानात घ्यावा. शरीरातील बरीच महत्वाची प्रथिने यकृतात तयार होतात. त्यामुळे या आजारात त्या प्रथिनांचे उत्पादन खूप कमी होते.

उरलो आता भिंतीवरल्या ...  

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 25/11/2019 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.

कठीण कठीण कठीण किती

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/11/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis) : भाग १ यकृत हे आपल्या उदरात उजव्या बाजूस श्वासपटलाच्या खाली वसलेले एक महत्वाचे इंद्रिय आहे. शरीरातील इंद्रियांपैकी ते सर्वात मोठे असून ते प्रौढ व्यक्तीत सुमारे दीड किलो वजनाचे असते. ते अन्नपचनात महत्वाची मदत करते. यकृतातून तयार होणारा पित्तरस हा मेदांचे पचनास आवश्यक असतो. शरीरातील एकंदरीत चयापचयात यकृत एखाद्या गृहमंत्र्याप्रमाणे महत्वाची भूमिका बजावते. शरीरात बाहेरून शिरणाऱ्या आणि चयापचयात निर्माण होणाऱ्या अनेक विषांचा ते नायनाट करते. त्याची एकूण कार्ये ५००च्या घरात आहेत ! म्हणूनच ते जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

कीप डॉक्टर अवे..

लेखक आजी यांनी सोमवार, 18/11/2019 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या सत्तर वर्षांची झालेली असल्याने, म्हातारडी, थेरडी वगैरे झालेली आहे. सभ्य भाषेत ज्येष्ठ नागरिक. वयपरत्वे माझे सर्व अवयव दुखत असतात. मी तिकडं लक्ष देत नाही. म्हातारपणी दुखायचंच म्हणून समाधान मानून घेते. माझे गुढगे दुखतात इथंपर्यंत ठीक आहे. पण माझी बोटं दुखतात, विशेषतः दोन्ही हातांचे अंगठे दुखतात, हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल. अंगठे हा काय दुखावा असा अवयव आहे का? उद्या भुवई दुखेल, नखं दुखतील, कानाची पाळी दुखेल! तर अशी ही माझ्या अवयवदुखीची तऱ्हा. हाताचे अंगठे दुखायला लागले की मला लिहिताना, टाईप करताना त्रास होतो. म्हणजे लिहिणं खुंटलंच. चेकप सगळा करूनही उत्तर एकच.

pmpml प्रवासाचा सुखदायक अनुभव !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी सोमवार, 18/11/2019 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
परवा हडपसरला काही कामानिमीत्त जायचे होते. इतक्या लांब कसे ज्याचे ते पाहत होतो आम्ही, तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले. म्हणून मग मनपा ला गेलो तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले. तसे त्या बस स्टॉप ला गेलो. तिकडे १११ लागलेलीच होती. मस्त एसी गाडी अर्थात इलेकट्रीक बस होती ती. पहिल्यांदाच त्या बस मध्ये बसायला मिळाले. थोड्याच वेळात ड्राईव्हर कंडक्टर आले आणि बस सुरु झाली. अतिशय आरामदायक आणि कसलेही धक्के न बसता प्रवास चालू झाला. बस फिरत फिरत दांडेकर पूल स्वारगेट असे करत कॅम्प मधून हडपसर रोड ला लागली. बाहेर बघत प्रवास चालू होता.

शिकणं...

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी रविवार, 10/11/2019 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी घरातले शाळेत सोडून जातात तेंव्हा दोन पर्याय असतात समोर. एकतर आजूबाजूला रडणाऱ्या सगळ्यांसारखं भोकाड पसरून रडणे किंवा पाणी डोळ्यातच थोपवत शाळा सुटायच्या घंटेची वाट बघणे. आपण दुसरा निवडतो. खरंच किती शिकतो ना स्वत:कडूनच? परीक्षा देत देत मोठे व्हायला लागतो एखादा पेपर जातो अवघड. वाटत झालं आता, मार्क्स कमी पडणार आणि ते तसे पडतातही. वडील सहामाहीच्या प्रगतीपुस्तकावर सही करताना काही म्हणत नाहीत पण ते मार्क्स आपल्याच डोळ्यात खुपतात मग पुढच्या चाचणीत आपण त्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ते जेतेपदाच्या निशाणीसारखे मिरवत आणतो प्रगतीपुस्तकावर.

या जन्मावर या जगण्यावर..

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी गुरुवार, 07/11/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
बाळकृष्ण वारजे आणि सुमती वारजे हे दांपत्य आज जीवन हॉस्पिटलमध्ये आले होते. आज सुमती वारजे यांच्या चेकअपचा रिपोर्ट येणार होता. नर्सने बोलावलं तेव्हा ते दोघं डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेले. "नमस्कार. बसा." डॉक्टरांनी त्यांना बसावयास सांगितले. "डॉक्टर रिपोर्टस् चं काय झालं??" बाळकृष्ण यांनी विचारलं "थोडं मन घट्ट करा सर." डॉक्टर म्हणाले. "काही प्रॉब्लेम आहे का??" सुमती वारजे म्हणाल्या. "तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. त्यामुळेच तुम्हाला सारखी चक्कर येते. हे बघा एक्सरेमध्ये पण गाठ दाखवत आहे." डॉक्टरांनी एक्सरे दाखवला. त्यात एक गाठ दिसत होती. "टेन्शन नका घेऊ आपण ऑपरेशन करून ती काढून टाकू.

ब्लॉक (Block)

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी रविवार, 03/11/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
Block किती छोटा शब्द आहे. अडीच अक्षरी आणि इंग्रजीत चार अक्षरी पण, या छोट्याशा शब्दाने संवादच संपून जातो. काही काळापुरता नाहीतर कायमचा. किती सोपं झालंय आजकाल आपल्याला नकोसं असणारं कोणी ब्लॉक मध्ये टाकलं जातं नाहीतर आपण कोणाला नकोसे झालो तर आपल्याला ब्लॉक केलं जातं. खुप प्रसिद्ध झाला आहे शब्द हा. नाही आवडलं कर ब्लॉक नाही पटलं, राग आला, नकोसं झाली कोणी कर ब्लॉक. ते पण एक टच वर. फक्त एक टच आणि झालं समोरचं माणूस ब्लॉक. संवाद तिथंच संपला. त्या व्यक्तीला काय वाटेल मन दुखावलं जाईल याचा विचार पण येत नाही.