Skip to main content

जीवनमान

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

लेखक मार्गी यांनी सोमवार, 26/08/2019 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा २९ जुलै! ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज नार्कंडावरून रामपूर बुशहरला जायचं आहे. काल नार्कंडाला चांगला आराम झाला. रात्री पाऊसही झाला. २७०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर रात्री काही त्रास झाला नाही. आजचा टप्पा तसा सोपा आहे, कारण आज चढाव अजिबात नाही आहे. उलट मोठा उतारच आहे.

दुपारची झोप..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/08/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात. फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

देवघर

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 19/08/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

लेखक मार्गी यांनी सोमवार, 19/08/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
२: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना २५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे! सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात.

जिवाचा सखा..

लेखक आजी यांनी रविवार, 18/08/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारपणी टीव्हीसारखा दुसरा मित्र नाही. सतत फक्त टीव्ही बघावासा वाटायला लागला की समजावे, आपले वय झाले. (आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले.) मलाही अशीच म्हातारपणाची जाणीव झाली ती टीव्हीमुळे. पेपरमधल्या बातम्या बारीक अक्षरात वाचण्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या बघायला जास्त आवडायला लागल्या. रेडिओवरच्या गाण्याबरोबरच टीव्हीवरची गाणी बघायला आवडायला लागली. टीव्हीवरच्या मालिकेतल्या सासवा सुना, सुनेचा छळ, नायिकेवर-नायकावर येणारी संकटे, त्यातली व्हरायटी, सासूने सुनेवर विषप्रयोग करणे, खलनायकाने नायकाचा अकारण द्वेष करणे यांसारख्या गोष्टीत मन रमायला लागले.

तुम्ही बहुभाषिक आहात का?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 15/08/2019 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं. याचंच निमित्य म्हणून आपल्या मिपावर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला? माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! :) कितपत येते? वाचता येते की बोलता येते? कि फक्त समजते? कुठे शिकलात?

त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 15/08/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.

गावची हवा...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/08/2019 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अहिराणी पट्ट्यात (आणि इतरत्रही) पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची. वाहनांची आताच्या इतकी प्रचंड संख्या नव्हती. प्रदुषण नव्हतं. घरं सिंमेटची नव्हती. मातीची होती. गावातल्या गल्ल्या मातीच्या. गावाच्या आजूबाजूच्या पांद्या मातीच्या. घराघरात रेडीओ, टीव्ही, फॅन नव्हते. कुठं कुठं रेडिओ येऊ लागले होते. गावात खूप झाडं नसली तरी गावाच्या आजूबाजूला आमराया असत. इतर झाडी असत. गावाला लागून असलेल्या पाट थळाच्या पिकांना कायम पाणी सुरू असायचं.

तत्त्वमसि ।

लेखक मायमराठी यांनी रविवार, 11/08/2019 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
" तत्त्वमसि" पहिल्या घटक चाचणीचा शेवटचा पेपर देऊन शाळेच्या बसमधून येताना गार्गी आणि व्योम मनातल्या मनात कोकणातल्या आजी-आजोबांकडेच जातोय असं समजत होते. आता चतुर्दशीपर्यंत सुट्टी. आज पॅकिंग, उद्या भल्या पहाटे प्रयाण, गावात पोचल्यावर सजावटीची धामधूम, विहिरीत व ओढ्यात डुंबणे, आजीकडून खायचे प्यायचे चोचले पुरवून घेणे, आजोबांकडून अमर्याद लाड करून घेणे आणि अनंत गोष्टी या दोघांच्या मनात कोवळ्या गवतासारख्या तरारून येत होत्या. गार्गी ९वीत आणि व्योम ६ वीत, अभिषेक आणि अर्चना यांची गोंडस मुलं. नोकरी मुंबईत आणि गाव कोकणात या पठडीतील एक मध्यमवर्गीय कुटुंब. तसं आजकाल मध्यमवर्गीय कोण?