Skip to main content

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटस अ‍ॅपचा मेसेज नाही. ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा. तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप? ती: एसएमएस नाही वाचला. वाचते. तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना? ती: हं तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर? ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी. तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय. ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो. तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील? ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल. तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता. ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला. तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू. ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून. - पाभे

वाचने 2537
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया