Skip to main content

जीवनमान

थुंकणार्‍याची मानसिकता

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 13/12/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्‍यात,लॉबीच्या कोपर्‍यात, लिफ्ट मधे कोपर्‍यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्‍या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले भाग प्रकाशित केलेले आहे भाग ३ या अश्या गोकुळात ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ८ भावंडं जमायचो. दुपारी बदाम सात चा कार्यक्रम ठरलेला असायचा, हरेल त्याने ४ वाजता येणारी कुल्फी खाऊ घालायची. खाऊ घालायची म्हणजे काय तर स्वतः सगळ्यात शेवटी खायची सगळ्यांना आणून दिल्या नंतर कारण पैसे तर आजोबाच द्यायचे. या बदाम साथ च्या खेळात माझ्या सारख्या प्रामाणिक खेळाडूंना जिंकायचा काहीही मार्ग नव्हता हे मला कळले जेंव्हा मोठ्या मामीच्या चटई खालून २ राजे अचानक बाहेर आले. तो पर्यंत राजा आला कि सगळ्यांना कळेल कि अश्या पद्धीतींनी मोठ्यांनी आवाज काढायचा असाच वाटायचं.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग प्रकाशित केलेला आहे तर हे माझ्या आजीचं घर नेहमी गजबजलेले असायच, मामा, मामी, २ मामे भाऊ असा सतत वावर असायचा. मी आणि धाकटा भाऊ citizens नसलो तरी permanent residency visa वर असायचो. मामी आणि आई दोघीही नोकरी करत असल्यामुळे, दिवसभर आमचा पसारा उचलायला आजीच असायची. आम्ही चौघेही वेगवेगळ्या कारणांमुळे आजी च्या fav लिस्ट मध्ये होतो. मोठा मामे भाऊ पहिला "नातू" म्हणून कौतुकाचा, मग मी काळी बेंद्री असली तरी शांत आणि खूप पुस्तकं वाचते म्हणून, धाकटा मामे भाऊ मृदू स्वभावाचा म्हणून (मोठ्यानि नाकात नऊ आणले कि हा भाऊ देव वाटायचा मला पण) आणि माझा भाऊ शेंडेफळ नातू, म्हणून भाव खाऊन जायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
तितली रानी तितली रानी मुझको दे दो अपने पर पर लगाके उड जाऊंगी अपनी नानी के घर मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं. लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल. माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.) तर गोकुळ हे त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे मोठ्या जागेवर बांधलेलं ऎसपैस घर.

आशय - भाग ७ - समाप्त

लेखक किंबहुना यांनी शुक्रवार, 06/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ प्रस्तावना - पहिल्या प्रस्तावनेत पण मी म्हणालो होतो, की महिला अत्याचार हा साधारणपणे नेहमीच ऐरणीवर येणारा विषय आहे, पण पौगंडावस्थेतील मुले देखील बऱ्याच वेळेस अश्याच गोष्टीना सामोरी जात असतात. या भागात अजून काही टाळता ना येण्याजोगे प्रसंग येतील. यामध्ये मला स्वतःला victim card खेळायची इच्छा नाही, देवाच्या कृपेने मी आता वयाच्या अश्या टप्प्यावर आहे की या गोष्टींचा काहीही दृश्य परिणाम माझ्या आयुष्यावर नाही, मला स्वतःला मुलगा पण नाही, ज्याची मी काळजी करावी.

दूष्काळ झळा...

लेखक गणेशा यांनी सोमवार, 02/12/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चोचभर दाण्यासाठी वेशी बाहेर पाखरं टीचभर पोटासाठी घर उंबर्‍याशी वैर || पाणी आटलं डोळ्यात शेत जळलं रानात पोर धाडलं शरात गाव दुष्काळ पिडित || कधीची दारातली तुळस .. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली... पांढर्‍या रानागत गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, जेंव्हा होता आवळला फास... नाही गोठ्यामधी माय ना टोपल्यात भाकर गुलछडी उभी पेटली काऴळ ठिक्कुर घर || शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली, अन्नाचा कुठ हाय तपास... शासनाची पांढरी बुजगावनी..
काव्यरस

पर्स..

लेखक आजी यांनी सोमवार, 02/12/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पर्स म्हणजे एक वस्तुसंग्रहालय आहे. माझ्याकडे इतक्या पर्सेस आहेत, पण अजूनही मला माझ्या गरजा पूर्ण करणारी, योग्य आकाराची, आदर्श पर्स मिळालेली नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या पर्सेस आहेत. त्यांत मी बॅग बनवणाऱ्याकडून, लघुउद्योजक बायकांकडून, माझ्या अपेक्षा सांगून बनवून घेतलेल्या बॅग्जही आहेत. मला गरजेनुसार पर्सेस लागतात. सकाळी फिरायला जाताना लहानशी पाण्याची बाटली, मोबाईल, एक रुमाल आणि घराची किल्ली एवढंच सामावणारी लहान पर्स मला हवी असते. तर प्रवासाला जाताना मला मोठी पर्स हवी असते.

आशय - भाग ६

लेखक किंबहुना यांनी सोमवार, 02/12/2019 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 5 माझा संतापाने तिळपापड झाला. चहा प्यायच्या टेबलवर मी त्याला झाप झाप झापला. तो देखील मला सॉरी म्हणाला. तो म्हणाला की रात्री तूच माझ्या जवळ येऊन झोपलास, मला वाटले तुला सवय आहे याची, आणि नकळत माझ्या हातून तसे घडून गेले. मी देखील त्याला वॉर्निंग देऊन विषय संपवला.>>>>> पण विषय अर्थातच संपलेला नव्हता. जाणाऱ्या दिवसांसोबत माझा रागही शांत झाला. अश्यातच एका रात्री त्याने पुन्हा प्रोपोझल मांडलं. का कोण जाणे, मला या वेळेस त्याची दया आली, जे अतिशय अयोग्य होतं, पण ते मला खूप उशीर कळलं..

स्फुट : अनुभव

लेखक राघव यांनी शुक्रवार, 29/11/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!! हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले.