Skip to main content

जीवनमान

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 11/03/2020 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरो

COVID19 च्या नावानं बो बो बो बो

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 10/03/2020 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आयनाच्या बायना करोना काय जायना कायप्पाच्या भात्यातले रामबाणबी चालंना लसूण झाली कापूर झाला गोमूत्रानंबी हटंना एक एक करत देश गिळतोय तोडगा काय सापडंना वेट मार्केटी जलमला ह्यो शेअर मार्केटला सोडंना चिनी माल तकलादू पन ह्यो माल तुटता तुटंना आयनाच्या बायना करोना काय जायना

कृतघ्न -4

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 10/03/2020 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 आता पुढे.... किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते.

कृतघ्न -3

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 05/03/2020 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 आता पुढे - ‌घरातील वातावरण आता बदलत होत. रामदास ला देखील याची थोडीफार जाणीव झालेली होती, इतके वर्ष घरातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबावर आलेले प्रत्येक संकट लिलया पेलणाऱ्या माउलीच्या विरोधात आता घरातील च काही लोकं छुपा मोर्चा उभारत होते. ज्या सुना माउलीने घरात वाजत गाजत आणल्या होत्या त्याच सुनांनी आता माऊलीच्या विरोधात आपल्या नवऱ्याचे कान भरले होते.

कंटाळा..

लेखक आजी यांनी मंगळवार, 03/03/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खूप कंटाळा येतो. तो नेमका कशाचा येतो, सांगता येत नाही. सगळं सुखात चालू असतं. आखीव, रेखीव रुटीन. शीशी,मम्मं गाईगाई. त्यात कसलाही बदल नाही. खरं तर नो न्यूज इज गुड न्यूज, असं म्हणतात. त्यानुसार आपला रोजचा घटनाक्रम त्याच वेळेला, तशाच पद्धतीनं चालू आहे ही चांगलीच गोष्ट आहे की नाही? पण नाही. आपल्याला ती चांगली वाटत नाही. काहीतरी वेगळं घडावंसं वाटतं. रुटीन तोडायचं म्हणून पर्यटनाला जाणे, सिनेमाला जाणे, फिरायला जाणे, मित्रमैत्रीणींच्यात गप्पा मारणे असे काही उपाय आपण करतो. पण ते वरवरचे असतात. खोल कुठेतरी कंटाळा हटवादी तापासारखा आपल्यात मुरलेला असतो.

अंबानींची फणी

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 28/02/2020 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
उदघाटनाला आला कोण ? उद्योगपती सम्राट अंबानी स्टेजवर जाताना ठेच लागली त्यांची पडली खाली फणी डोळे चुकवून पटकन उचलली घेऊन गेलो घरी लक्ष्मीपतीची तरी फणी आणेल संपत्ती आपल्या दारी कामधंदे सोडून सारे फणी पुजू लागलो रोज धुपारती शंख वाजवुनी वाहायचो भरपूर फुले येड लागलं बापाला आपल्या हसत होती माझी मुले हसत हसत सांगून टाकले त्यांनी शेजारीपाजारी जाऊन इमारतीतले गोळा झाले सारे झाडून वॉचमनापासून चर्चा वाढत गेली अन मी गल्लोगल्ली फेमस झालो फणीमातेचा भक्त म्हणोनि शहरात प्रसिद्धी पावलो हीच संधी मी साधुनी ठरवलं भरायची आपली तिजोरी फणिमता हि पावते त्याला जो तोरण बांध

कांताला सुरु झाल्या वांत्या

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 28/02/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कांताला सुरु झाल्या वांत्या नाव आलं पुढे लगेच अंत्या अंत्या बोल्ला तो मी नव्हेच असेल तो शेजारचा बंट्या त्यालाच बघितलं व्हतं शेतात गप्पा मारताना परत आलो जाऊन तेव्हा बघीतलं झुडुपात कोणीतरी हलताना धरून आणला बंटी मंग आवळली त्याची खुंटी बंट्या बोलला मी तर बाबा शेतात खपत होतो खिल्लारी जोडी झुडुपामागं त्यांनाच जोडत होतो आईची आन, मी नाही केली घाण शपथेवरती सांगतो पकडा जाऊन राजुला तोच कांतावर झुरतो कांता करतेय वांत्या तिला बघतं नव्हतं कोणी जो तो आपला विचार करतोय कोण असेल हिचा शिरोमणी ? वांत्या करुनि अर्धी झाली तरी तिला कुणीच बघत नव्हते इतक्यात अचानक अवतरले

कृतघ्न -1

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 27/02/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : मला दीर्घ लिखाणाचा कोणताही अनुभव नाहीये. पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुकल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतील हि अपेक्षा. मे 2016 गावातील एक प्रितिष्ठित घर, ज्या घरी पैसा , संपत्ती सामाजिक मान सन्मान या सर्वांची कोणतीही कमतरता नव्हती असे हे घर. या घराने खूप उन्हाळे पावसाळे पहिले होती. कमालीची दरिद्री. शेती असून देखील ती करायला येत नाही कारण सर्व जमिनींवर दावे आणि कोर्टकचेऱ्या, घरी सदैव सासू सुना आणि जावा यांची भांडणे आणि त्यात सतत कोणाचे ना कोणाचे तरी आजारपण. घरात एकूण नऊ भावंडे. पण कोणाचाच कोणाला मेळ नाही.

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 27/02/2020 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय अक्कल सारी गुडघ्यात यांची , दुसरं करणार तरी काय ? लंपट समजून मला तिने ,

ट्रम्प व्हिझिट पुणे

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 24/02/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.