मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेळघाट ...

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)

वाचने 4320 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मनिष 27/11/2019 - 13:13
कवितेत पुनःप्रवेशाच्या शुभेच्छा.
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे
प्रत्ययाकारीपणे अंगावर येतंय रे.

खिलजि 27/11/2019 - 16:21
"" आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. "" इथे थोडं काहीतरी भारदस्त हवं होत असं वाटतंय .. जसं कि "" आटलेल्या पाण्यातला, आमच्यासाठी गाळ रे.."' किंवा काहीतरी वेगळं .. पण एकंदरीत हेलावून टाकणारी झालीय .. मस्त

जॉनविक्क 28/11/2019 - 01:41
तुझ्या सारखे मिपाकर दिसतात म्हणूनच माणुसकीवर थोडाफार विश्वास उरला आहे

प्रचेतस 28/11/2019 - 08:45
मेळघाटातील बहुतांश आदिवासी पाड्यांचे आता बाहेरील भागात विस्थापन झालेले आहे त्यामुळे त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण नक्कीच काहीअंशी कमी झालेले आहे आता.