Skip to main content

जीवनमान

बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 24/02/2020 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला जीव माझ्झा कासावीस झाला असलीस जरी तू तोंडाने फाटकी तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी रंगबिरंगी चांदण्या त्यावरी झेलण्या ओघळण्या पाऊस सरी कापड ऐसे तरल मुलायम पिळवटते हे हृदय ते कायम सडपातळ ती नाजूक दांडी बघणार्यांच्या उडती झुंडी बटनावरती नक्षीदार दांडा देती सलामी बघणाऱ्या सोंडा काय असे ते गुपित न कळले त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले मीही नसे अपवाद त्याला मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला =========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/02/2020 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने... मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत.

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/02/2020 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिन्यांनंतर मिपावर आले आहे... लेखन तर नाहीच पण वाचन देखील काही महिने जमलं नव्हतं. पण आता परत एकदा सगळंच सुरू करीन म्हणते. #नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन! वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते.

शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा आदर

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 20/02/2020 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतात्सु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः शिवाजी महाराज कि जय . सगळा आसमंत दुमदुमून गेला या गर्जनांनी . सगळीकडे उत्साह भरून राहिला आहे. शिवाजी महाराज , काय आहे या माणसामध्ये जे इतके वर्ष होऊन गेले म्हणजे अगदी इ.स. १६३० ते १६८० चा काळ तो. आज १९ फेब्रुवारी २०२० , शिवजन्मापासून ३९० वर्ष होऊन गेलीत पण त्यानंतरही इतक्या अठरा-पगड जातीमधे मानान घेतलं जाणार नाव . काय कारण असेल कि इतके शूर-वीर होऊन गेले , इतके शासक होऊन गेले पण शिवाजी महाराजांची पातळी कोणी गाठू शकाल नाही.

मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

लेखक खिलजि यांनी बुधवार, 19/02/2020 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ? मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये तुझ्याकडून गिफ्ट आलेलं पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं हादरून गेलो उभाआडवा , काहीच सुचलं नाही लक्षच लागत नव्हते माझे , सारखा स्कीनवर बघत राही त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती इनबॉक्समध्ये तुझ्यातर्फे फक्त एकच गिफ्ट होती तिंहीं मजला जड होऊन आता नकोशी वाटत होती बुद्धू ती कि मीच खुळा याचा हि

अन्न खाता दुःखी भव..!!

लेखक आजी यांनी सोमवार, 17/02/2020 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी सुरुवातीलाच कबूल करते की,मला खाण्यात इंटरेस्ट आहे. मी पक्की खवैय्यी आहे. माझं वजन वाढलेलं असल्यानं डाएटिशियन सांगेल तेच मी खाते. पण न राहवून, मोह न आवरल्यामुळे मी ते डाएट अनेकदा मोडतेही. ज्यामुळे वजन वाढतं ते सगळे पदार्थ मला अतिशय आवडतात. म्हणजे तळलेले आणि गोड पदार्थ. माझे फँमिली डॉक्टर मला आवडतात, कारण ते मला म्हणतात,"you are fat but fit. your reports are normal. "फॅट बट फिट!वा वा! तरीही वाढलेलं वजन माझं मलाच खुपतं आणि मी (वारंवार) डाएट करते. कुणी जेवायला बोलावलं की मला फार आनंद होतो.

वक्तशीर..

लेखक आजी यांनी सोमवार, 03/02/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी अतिशय वक्तशीर आहे. नोकरी करत असताना ऑफिसला मी अगदी वेळेवर जायची. इतकी की सगळेजण"तू काय ऑफिस झाडायला येतेस का?"अशी माझी चेष्टा करायचे. मी ऑफिसात पोहोचायची तेव्हा कुणीही आलेलं नसायचं. माझी केबीनही साफ केलेली नसायची. टेबल पुसलेलं नसायचं. इतरांवर अवलंबून असलेली माझी कामं खोळंबायची. कँटीनमध्ये कॉफी,खाणं तयार नसायचं. एकूण मीच भोटम ठरायची. कुणी मला पाच वाजता एखाद्या ठिकाणी बोलावलं तर मी पाचच्या ठोक्याला,नव्हे पाच दहा मिनिटं आधीच तिथं जाऊन पोहोचते. त्यासाठी घरातून कितीला निघायचं त्याचा मी हिशेब करते.

एकदा तरी माती व्हावे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/01/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा तरी माती व्हावे कधीतरी इतरांच्या पायी जावे एकदा तरी माती व्हावे नको राग लोभ कशाचा मी माझाच नाही आहे सर्वांचा नको व्यर्थ माझे माझे करावे एकदा तरी माती व्हावे दैन्य इतरांचे पाहून मग कळते मी किती सुखी ते आपलेच सुख आपल्याला टोचावे एकदा तरी माती व्हावे चारी ठाव घरी खातसे ताटात गरम पक्वाने कागदावर अन्न केव्हातरी चाखावे एकदा तरी माती व्हावे वापरसी अंघोळीस पाणी मुबलक फासशी साबण अंगास सुवासीक शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे एकदा तरी माती व्हावे सेवा करवून घेई स्वत:ची हातात सार्‍या वस्तू येती कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे एकदा तरी माती व्हावे आत्मकेंद्री स्वभाव होई म
काव्यरस

लवकर शहाणे व्हा!

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 26/01/2020 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
लवकर शहाणे व्हा! ============ निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार... माणसाचा विवेक जगण्याच्या ताणातून संपतो, शरीराला (पर्यायाने मेंदूला) सडवणा-या पर्यावरणातून तो संपवला जातो. धान्याला किड लागली की धान्य निवडून किड संपत नाही. धान्याला उन दाखवावे लागते, धान्य साठवायची (पर्यावरण) जागा बदलावी लागतो.

साडेसातीतले वास्तविक उपाय!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 24/01/2020 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल. साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल. पण वास्तवात असं आहे का?