परवा हडपसरला काही कामानिमीत्त जायचे होते. इतक्या लांब कसे ज्याचे ते पाहत होतो आम्ही, तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले. म्हणून मग मनपा ला गेलो तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले. तसे त्या बस स्टॉप ला गेलो. तिकडे १११ लागलेलीच होती. मस्त एसी गाडी अर्थात इलेकट्रीक बस होती ती. पहिल्यांदाच त्या बस मध्ये बसायला मिळाले. थोड्याच वेळात ड्राईव्हर कंडक्टर आले आणि बस सुरु झाली. अतिशय आरामदायक आणि कसलेही धक्के न बसता प्रवास चालू झाला. बस फिरत फिरत दांडेकर पूल स्वारगेट असे करत कॅम्प मधून हडपसर रोड ला लागली. बाहेर बघत प्रवास चालू होता. बाहेरचं दृश्य काही फार सुखावह नव्हतं पण आम्ही आरामात एसी बस मध्ये असल्याने प्रवास कंटाळवाणा आणि त्रासदायक नव्हता. नाहीतर इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हटल्यावर काटाच आलेला. परत येतानाही आम्हाला पुन्हा डांगे चौक ची तशीच इलेक्ट्रिक बस मिळाली , त्यामळे दोन्हीवेळा आरामदायक प्रवास झाला. खरोखर अशा आरामदायक बसेस जर सगळीकडे सुरु झाल्या तर किती मजा येईल असा विचार सहजच मनात आला.
बाकी रस्ते, त्यावरची धूळ,गर्दी, कचरा, बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणे सारं काही खुपत होतच. तेव्हा स्मार्ट सिटी साठी आपल्या महापालिकेने केलेला आटापिटा पहिला कि खरच चीड आणि कीव दोन्ही येते प्रशासनाची. या अशा सुविधा नागरिकांना मिळत असताना स्वतःला स्मार्ट सिटी म्हणवून घेण्याच्या हिमतीची दाद द्यावी तेवढी थोडीच!!!
याद्या
3723
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
इलेक्टरीक बस अफलातून प्रकरण आहे
हो, मस्त आहे ही बस, एकदम
या बसेसचे नाव काय आहे? एसी बस
ओलेक्ट्रा असं या बसचं नाव /
पीएम्पी ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस
In reply to ओलेक्ट्रा असं या बसचं नाव / by चौथा कोनाडा
सगळ्याच बसेस अशा हव्यात.
किमान
मस्त
तेव्हा मनपा वरून बस असते असे