प्रिय मित्रहो,
आता निरोप घ्यावयाची वेळ आली आहे.फार वर्षांपूर्वी येथे लिहावयास सुरवात केली आणि सुटलोच म्हणावयास पाहिजे.निरनिराळ्या
विषयांवर मनसोक्त लिहले. याचे एक कारण म्हणजे मी जमा केलेली नाना विषयांवरची पुस्तके. त्यांत फार निवड होती असेही नाही. पण
आपण वाचलेले जर आपणास आनंद देते ते इतरांनाही देईल या कल्पनेने त्यावर लिहले. सभासदांना आवडले असावे (ही एक मनाची गोड समजूत्)पण प्रत्येक गोष्टीला शेवट पाहिजेच नाही कां ? तेव्हा आंता लेखनाला पूर्णविराम. पण जातांना एक गोष्ट करावयाची इच्छा आहे. जमवलेली पुस्तके येथील मित्र-मैत्रिणींना सप्रेम भेट म्हणून द्यावित. यांत बरेच काही आहे.