सप्रेम द्या निरोप
प्रिय मित्रहो,
आता निरोप घ्यावयाची वेळ आली आहे.फार वर्षांपूर्वी येथे लिहावयास सुरवात केली आणि सुटलोच म्हणावयास पाहिजे.निरनिराळ्या
विषयांवर मनसोक्त लिहले. याचे एक कारण म्हणजे मी जमा केलेली नाना विषयांवरची पुस्तके. त्यांत फार निवड होती असेही नाही. पण
आपण वाचलेले जर आपणास आनंद देते ते इतरांनाही देईल या कल्पनेने त्यावर लिहले. सभासदांना आवडले असावे (ही एक मनाची गोड समजूत्)पण प्रत्येक गोष्टीला शेवट पाहिजेच नाही कां ? तेव्हा आंता लेखनाला पूर्णविराम. पण जातांना एक गोष्ट करावयाची इच्छा आहे. जमवलेली पुस्तके येथील मित्र-मैत्रिणींना सप्रेम भेट म्हणून द्यावित. यांत बरेच काही आहे. यादी द्यावयाची तर बरीच जागा जाईल. उदा. रामायण-महाभारताचे प्रत्येकी ९ खंड; अध्यात्म-धार्मिक २०-२५ पुस्तके, १०० च्या आसपास कवितासंग्रह्,जगातील अनेक संग्रहालयावरील पुस्तके, अरेबियन नाइट्स (गौरी देशपांडे ) यांचे भाषांतरीत सर्व भाग (मागे कुणातरी 'ताईं ना ते घ्यावयाचे होते ,त्यानी घेतले नसतील तर त्यांचा पहिला नंबर); इत्यादि. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.माझा पत्ता : शरद हर्डीकर,फिनिक्स (बी) अपार्टमेन्ट, सेनापति बापट मार्ग. डामिनोज पिझा च्या मागे.पुणे १६. दू.ध्वनी ९९२३० ६२६७३ वयोमानामुळे बूकपोस्ट करता येणार नाही याची माफी मागतो. घरी येऊन गोळा करावी लागतील.वेळ : सकाळी ८ ते रात्री ८. यावयाच्या आधी फोन केल्यास उत्तम.सर्वांना शुभेच्छा. आ.न. शरद बोले अखेरचे तो , आलो इथे रिकामा सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे
वाचने
5161
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
सर...
निरोपाची भाषा कशाला.
निरोपाची भाषा कशाला.
राम राम .
आतमध्ये कुठेतरी तुटलं,
In reply to आतमध्ये कुठेतरी तुटलं, by प्रचेतस
+१००
In reply to +१०० by गवि
नको अशी निरवानिरवीची भाषा
अरेबियन नाइट्स (गौरी देशपांडे
In reply to अरेबियन नाइट्स (गौरी देशपांडे by विजुभाऊ
अरेबियन नाईटस् बद्दल विचारणा
काय कमाल अप्रतिम लेखन केले
आत्म्याला सत्ता आहेच पण सातत्यही आहे.सुंदर वाक्य! तुमचे उपनिषदांवरचे लेख वाचत आहे, अप्रतिम खजिना मला गवसला आहे. लिहित रहा!निरोप घेणे नेहमीच जड जाते
बाकी
तुमची आणि माझी ओळख नाही....
सदिच्छा भेट....
In reply to सदिच्छा भेट.... by कर्नलतपस्वी
छान!
In reply to सदिच्छा भेट.... by कर्नलतपस्वी
वाह..
In reply to सदिच्छा भेट.... by कर्नलतपस्वी
क्या बात है.
In reply to सदिच्छा भेट.... by कर्नलतपस्वी
प्रत्येक शब्दाशी सहमत आहे