Skip to main content

सुटलेला डाव !

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 05/01/2024 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज भांबावला दिस काही येई ना मनात अंधार व्यापलं आकाश उजेड उरे पणतीत ठरलेल्या अवसरी रान गेलंच उठून पक्षी शोधी रानमेवा पंख जाती हो थकून . खेळ चुकलेला सारा मना दुःख्ख देई मोठे तिथे लावो कोणी लेप सारे मोठ्ठे खोटे खोटे कोठे गेली हीरवळ मन शिडकावे तीला मोडलेल्या फांदीवर एक बांधलेला झुला . सारे खोट्यात खोट्यात काय शोधू खरे खरे नशिबाचे तोडून तारे दगडाला म्हणती हिरे अंती खरे एक आहे झाले ते ते स्विकारावे आयुष्याच्या सरणीला मोजून ते ते मांडावे . सारा हिशेबच आहे आयुष्याचा हाच धंदा कधी बंदा लागे हाती कधी पोकळीचा चंदा काय करू अंत याचा ? काव्य म्हणू की भावना ? धरले व्यवहारात तुम्ही काव्य, नाही तर ? भाव ना ! सारे तूटून तूटून शब्दानीच मी जोडतो पुढे जमो पुन्हा डाव सुटलेला हा सोडतो . सूटलेला हा सोडतो . ---------------------------- अतृप्त - ५/०१/२४
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2984
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

एकेक कडवे पुन्हापुन्हा वाचले. कविता खूप आवडली. सं - दी - प

मीटरपण चांगला सांभाळला आहे. मल्टीटॅलेंटेड गुरुजींचं लै कौतुक वाटतं!