मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

सत्यजित... ·
लेखनविषय:
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी... तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा! चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती... तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा! कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा... तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा! मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा... अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा! —सत्यजित

अंदाजे-गालिब

मिडास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ.

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

drsunilahirrao ·
काव्यरस
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव

राउळी या मनाच्या

वेल्लाभट ·
लेखनविषय:
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोड

गजलांकित प्रतिष्ठान

माहितगार ·
लेखनविषय:
जनार्दन केशव म्हात्रे आणि त्यांच्या गजलांकित प्रतिष्ठान बद्दल (आंतरजालावर स्वतंत्र स्रोतातून पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे माहितीची खात्री करुन हवी अथवा दुजोरा हवा आहे. गजलांकित प्रतिष्ठान https://mr.wikipedia.org/s/30r3 विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील मराठी गजलांचे मुशायरे व गजलगायन मैफिली आयोजित क

जनार्दन केशव म्हात्रे -व्यक्ति परिचय

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विकिपीडियाचे माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत विवीध क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या पुरेशा नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. किंवा सर्व व्यक्ति / विषय मराठी विकिपीडियनना परिचीत असतातच असे नाही. असाच एक लेख नवे मराठी विकिपीडियन जनार्दन केशव म्हात्रे यांच्या बद्दल लिहिला गेला आहे. ज्ञानकोशीय उल्लेखनीय पुरेसा मजकुर स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती दुजोरा मिळवण्यासाठी मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao ·
लेखनविषय:
काव्यरस
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव

दु:ख अवघा धृवतारा मागते

drsunilahirrao ·
काव्यरस
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव

माणूस

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
(हि गझल मला पूर्वी डिसेंबरच्या महिन्यात इथे टाकल्यासारखी वाटतेय. पण आता कुठेच सापडत नाहीये मिपावर त्यामुळे गोंधळलोय. पुनरावृत्ती होत असल्यास कृपया कुठली तरी एकच प्रत ठेवावी ही संपादक मंडळाला विनंती.) माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ? बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो? नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ? पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो? पाठ थोपटते कुणीसे, लाज मग धिक्कारते ओढुनी पडदे मनाचे मी स्वतःला शोधतो ! विशाल कुलकर्णी ...

वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता? अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने विशाल कुलकर्णी