आयुष्यात प्रथमच हातात कॅमेरा नसल्याचे वैष्यम वाटले.
जून २४ ते डीसेंबर २४ ह्या कालावाधीत बायको डोळ्यात तेल घालुन पहारा ठेवते. बेसीन वरचे ओडोमॉस, आफ्टर शेव क्रीम गायब होते.
फक्त टुथ पेस्ट असते. मोज्याच्या गाठी मारुन ठेवल्या जातात. टीवी चा रीमोट लपवला जातो. टॉयलेट फ्लश झाले आहे की नाही ह्याची खात्री केली जाते. जाताना रुमाल्,मोबाईल्,छत्री परत आणा ची आठवण केली जाते. 'जेवलात का' चा फोन न चुकता असतो.
अशाच एक सकाळी श्री श्री श्री तात्या महाराजांचा फोन आला.
" मास्तर, आपल्याला ह्या भानगडीतले && काही कळत नाही. मी पडलो रांगडा माणुस. माझ्या कडे एक केस आहे. तुमचे क्षेत्र आहे.