मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा न आवडणार्‍यांकरता सप्रेम भेट...:)

विसोबा खेचर · · कलादालन
राम राम मंडळी, मिपा हे संस्थळ सर्व मायबाप मिपाकरांचं अत्यंत ऋणी आहे आणि यापुढेही राहील. मिपाकरांशिवाय मिपाला शोभा नाही असेही आम्ही वेळोवेळी म्हटले आहे. परंतु असेही काही जण आहेत की ज्यांना मिपा आवडत नाही. हरकत नाही! या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडलीच पाहिजे असा काही नियम नाही. पण मग करायचं काय? मिपा तर काही बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना मिपा आवडत नाही त्यांचा पूर्णत: आदर करून त्यांना मिपा प्रशासनातर्फे खालील वस्तु सप्रेम भेट देण्यात येत आहे. ती घालायची आणि चालू पडायचं! :) काय म्हणता? :) आपले, अभ्यंकर चपलावाले! :)
लेखनविषय:

वाचने 10389 वाचनखूण प्रतिक्रिया 31

दशानन Tue, 07/07/2009 - 01:29
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ !!!! साईझ प्रॉब्लम झाला तर तात्या :? काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

धनंजय Tue, 07/07/2009 - 02:21
पुन्हा कोणी मिपाला त्रास द्यायला सुरू केले काय? हे बरे नाही. असो. हे वारे अधूनमधून वाहातात आणि मग आपोआप शमतात. - - - आज तुम्ही कुठल्याही प्रथा-सुधारणेला धर्मद्रोह म्हणाला नाहीत? कोणाच्या परराष्ट्रधोरणाला देशद्रोह म्हणाला नाही? कुणी कशाबद्दलही सहानुभूती दाखवली त्याला भंपक म्हणाला नाहीत? अरेरे! मग स्वतःला स्वाभिमानी कसे म्हणवते तुम्हाला?

In reply to by धनंजय

आज तुम्ही कुठल्याही प्रथा-सुधारणेला धर्मद्रोह म्हणाला नाहीत? कोणाच्या परराष्ट्रधोरणाला देशद्रोह म्हणाला नाही? कुणी कशाबद्दलही सहानुभूती दाखवली त्याला भंपक म्हणाला नाहीत? अरेरे! मग स्वतःला स्वाभिमानी कसे म्हणवते तुम्हाला? स्वाक्षरी आवडली !!! :)

लिखाळ Tue, 07/07/2009 - 03:01
हा हा हा .. तात्यांना काय सुचेल त्याचा नेम नाही :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

चपला घाला आणि चालू लागा. :) पुण्याचे पेशवे काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? Since 1984

चतुरंग Tue, 07/07/2009 - 03:11
जरा ट्राय करुन बघाव्यात म्हणतो! :B ओ तात्या, दरवाजा लावून घेऊ नका बरं का, नाहीतर मी ट्रायल घ्यायला जायचो आणि हे हाटेलाचा दरवाजा लावून घ्यायचे! ;) (खुद के साथ बातां : रंगा, तात्याच्या पायाला ह्या चपला येतील की नाही शंका वाटते नई? :? ) (कष्ट मर)चतुरंग

नंदा Tue, 07/07/2009 - 04:10
मायकेल जॅक्सनच्या मृत्त्यूवरची त्यांची प्रतिक्रिया, आणि मिपाच्या काही भागावर टिका करणार्‍यांना जोडे घालून चालू लागण्याचा त्यांचा वरील संदेश - यांमुळे तात्यांविषयीचे मत वाइट झाले. त्यांच्या हिंदुस्थानी अभिजात, सुगम, आणि चित्रपटसंगीताविषयीच्या टिप्पण्या फार आवडतात. पण जॅक्सनच्या मृत्त्यूवरची त्यांची प्रतिक्रिया केवळ असभ्य आणि जोडे घालून चालू लागण्याचा त्यांचा संदेश पुणेरी दुकानदारांप्रमाणे हुकुमशाही वाटतो.

दिपाली पाटिल Tue, 07/07/2009 - 04:48
पण हा लेडिज चपलांचा जोड नाहिये म्हणजे फक्त ज्यांना मिपा आवडत नाही त्या माणसांनी "या चपला घाला आणि चालते व्हा" असा अर्थ आहे तर.. :? (ह.घ्या.) :D तसं ही या धाग्यातुन काही निष्पन्न नाही होणारेय तर अण्णा चिंबोरी म्हणतायत त्यात ही तथ्य आहे. दिपाली :)

आण्णा चिंबोरी Tue, 07/07/2009 - 04:40
हा काथ्याकुट आवड्ला नाही. भाग्यश्रीला टारगेट करण्यासाठी मुद्दामहून टाकलेला काथ्याकुट आहे. एखाद्या मवाल्याने सभ्य मुलीची टिंगल करावी आणी सगळ्यांनी फिदीफिदी हसावे असा प्रकार आहे. संपादक मंडळातील महिलांनी तरी जागे व्हावे आणी संबंधीतांना समज द्यावी. आण्णा चिंबोरी

In reply to by आण्णा चिंबोरी

टारझन Tue, 07/07/2009 - 07:51
आले आले ... अचानक समाजसेवक आले !! बांचोद बाझवला च्यामायला !! येउन एक आठवडा नाय झाला तर... ही असली गांडूळं फक्त कधीमधी पाऊस आला तरंच उगवतात !! तात्या आगे बढो !! येथे तरी कोणा एकाला टार्गेट केलंय असं वाटत नाही !! धाग्याचं एवढं मोठं नाव दिसत नाही बॉ पब्लिक ला !! उगा येऊन काड्या !! च्यायला चिंबोर्‍या हा धागा सोडून आजुन कुटं प्रतिक्रिया आहेत रं तुझ्या ? विनंती :- काय रे मुलांनो,, भाषा जमते आहे ना व्यवस्थित ? सध्या कामाला जायची गडबड सुरु असलेने प्रतिक्रिया जरा गडबडीत लिहिली आहे,समजुन घ्यावे ही विनंती. (अर्थात ही प्रतिक्रिया संध्यानंद मध्ये हिणकस दिनाच्या वेळी प्रसिद्ध झाला हा भाग वेगळा.) ( मिपसळपावचा/तात्याचा डाय-हार्ड फॅण ) टारझन टिंबोरी अवांतर : तात्या धागा एक णंबर्स !!!

रेवती Tue, 07/07/2009 - 07:25
संपादक मंडळातील महिलांनी तरी जागे व्हावे आणी संबंधीतांना समज द्यावी. वरील चपलांचा जोड हा दिपालीताई म्हणतात त्याप्रमाणे पुरुषांसाठी बनवलेला आहे. तो घालून चालते वगैरे होण्याचे ज्याचे त्याला ठरवू द्या. प्रश्न हा आहे की येथेही फक्त पुरुष सभासदांना एवढा सन्मान का? एखादा सुंदर लेडीज चपलांचा जोड असलेला फोटू का नाही चढवला? ज्या बायकांना चालते व्हायचे असेल त्यांनी पुरुषी चपला घालून का चालते व्हावे? एखादा गोंडेवाला, जरीकाम असलेला लेडीज चपलांच्या जोडाचा फोटू छान दिसेल असे वाटते. महिला संपादकांनी आधी या विषयावर विचार करावा. हा धागा तात्यांनी काढला आहे. त्यांनीच असा भेदभाव करणे बरे का? ;) राहता राहिला प्रश्न भाग्यश्रीला टारगेट करण्याचा! मला तरी तसे वाटत नाही. भाग्यश्रीच्या प्रतिक्रिया नेहमीच व्यवस्थीत असतात. आता या उप्पर जर कोणाला फिदीफिदी , खोखो किंवा कसेही हसायचे असेल तर तो निर्णय वैयक्तीक आहे असे वाटते. रेवती

विसोबा खेचर Tue, 07/07/2009 - 08:45
हा धागा केवळ विरंगुळा आणि मौजमजा म्हणून टाकला आहे. अर्थात, ह्याला 'मिपाचे धोरण!' असेही म्हणता येईल..! ;) यात कुणालाही टार्गेट वगैरे करण्याचा हेतू नाही आणि नव्हता इतकेच सांगू इच्छितो...
भाग्यश्रीला टारगेट करण्यासाठी मुद्दामहून टाकलेला काथ्याकुट आहे. एखाद्या मवाल्याने सभ्य मुलीची टिंगल करावी आणी सगळ्यांनी फिदीफिदी हसावे असा प्रकार आहे. संपादक मंडळातील महिलांनी तरी जागे व्हावे आणी संबंधीतांना समज द्यावी.
अण्णा, अरे किती बोलशील?! :) तात्या.

शैलेन्द्र Tue, 07/07/2009 - 08:45
तात्या.. तुमचा आधिकार मान्य करुनहि असं म्हणावसं वाटतं कि या धाग्यातुन फार काहि निष्प्नन्न होणार नाही. ज्यांना मिसळ्पाव आवडत नाहि किंवा आवडते, पण आत कुठेतरी वैयक्तिक दुखते, ति लोक या चपला घालुन आत फिरत राहणार, ऊगिच घाण करणार. पण ज्यांचे मिसळ्पाववर खरच प्रेम आहे, पण ज्यांना स्वत:ची मतं आहेत(जी तुमच्यापेक्षा वेगळी आहेत) त्यांना ऊगिच कानकोंदल वाटेल. ही दुसर्‍या प्रकरातील लोकं तुम्हाला खरच नकोत का?

In reply to by शैलेन्द्र

विसोबा खेचर Tue, 07/07/2009 - 08:53
ही दुसर्‍या प्रकरातील लोकं तुम्हाला खरच नकोत का?
अरे बाबांनो, ह घ्या रे..! लेको किती सिरियस व्हाल? :) तात्या.

अवलिया Tue, 07/07/2009 - 09:01
हा हा हा तात्या लै भारी ! :) --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

पाषाणभेद Tue, 07/07/2009 - 09:26
चप्पलच का तात्या ? बुट, सँडल, पावसाळी का नाही. ज्या अर्थी तुम्ही "चालू पडायचं" म्हणतात म्हणजे व्यायाम व्हावा हा आपला हेतू असतांना आपण कॅनव्हास / जॉगींग चे शुज का नाही देत? अवांतर: वेबसाईटला वारंवार व्हिजीट देणार्‍यांना रिकरींग व्हिजीटर संबोधले जाते. ते वेबसाईटची पॉपुल्यारीटी दर्शवते. थोडक्यात जे वारंवार मिपाला व्हिजीटतात त्यांना मिपा आवडते. त्यामुळे काहीजण आपाअपसात भांडण जरी करत असतील तर ते मिपावरच भांडतात म्हणून त्यांनाही मिपा आवडते आहे. आपण हे प्रेमाचे भांडण समजु या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. "झाले गेले विसरूनी जावे, पुढे पुढे चालावे", असे माननारा व - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

हा हा हा :) तात्या, तुम्ही पैसे भरता म्हणून आम्हाला वाट्टेल तसे संस्थळावर वागता येते आणि बरळता येते. उगाच कुठेही हाहाहा... हूहूहू करताही येते. न आवडणार्‍या गोष्टींविषयी शिमगाही घालता येतो. आम्ही फुकटे, फुकट्यांनाही इथेकिती मान, असो, चप्पल चांगलीच दिसते आहे. न जाने किस मोड पर शाम हो जाये.......!
वक्ते-पीरी शबाब की बाते | ऐसी है, जैसे ख्वाबकी बाते || फिर मुझे ले चली, उधर देखो, दिल-खाना-खराब की बाते
-दिलीप बिरुटे

आशिष सुर्वे Tue, 07/07/2009 - 09:41
शालीतले जोडे म्हणतात ते हेच का ब्वा? तात्याराव, जल्ला तुमी झ्याक हाणलीत बर्र का! (चिपलूनचो आहेर)

आशिष सुर्वे Tue, 07/07/2009 - 09:41
शालीतले जोडे म्हणतात ते हेच का ब्वा? तात्याराव, जल्ला तुमी झ्याक हाणलीत बर्र का! (चिपलूनचो आहेर)

विजुभाऊ Tue, 07/07/2009 - 10:37
वरच्या चित्रातल्या चपल्या ह्या कोल्हापुरच्या अभ्यंकरांच्या चपल्या की ठाण्याच्या अभ्यंकरांच्या चपल्या ;)

समजा अशी आयडिया कुनी केली तर... मिपात यायच !मस्त चापायच आवडल नाही म्हनायच ही सुंदर भेट घ्यायची. चालू पडायच. परत यायच परत चापायच परत आवडल नाही म्हनायच ....... मंग मस्त चपलेच दुकान काढायच. येथे ऎण्टिक चप्ला भॆटतीन प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ओ तात्या त्या चपला कराकरा वाजतात का हो ? नाही म्हणजे कोण घालुन गेलेच तर आवाजाने सगळ्यांना कळेल. आणी हो आम्ही पुणेकर असलो तरी कोल्हापुरच्या चपला आवडल्या. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? आमचे राज्य

दिपाली पाटिल Tue, 07/07/2009 - 11:50
ज्यांना मिपा आवडत नाही त्यांना भारी भेट आणि ज्यांना आवडतो त्यांना काय मिळणार म्हणजे तसं ठरवायला बरं पडेल(म्हणजे सगळ्यांना ठरवायला बरं पडेल) अवांतर : तात्यांनी हिशोब केला असेल की चपला कमी द्याव्या लागतील पण सगळेच मागायला लागले आता... :) ह.घ्या. बरं कां !! :) दिपाली :)

अनंत छंदी Tue, 07/07/2009 - 21:19
तात्यां, वाहणां कोंकंणी हव्यां होत्यां, तुम्हांस हें कसें कळलें नाही! :))

हरकाम्या Wed, 07/08/2009 - 01:54
पुण्यात जसे जोशी वडेवाले, भारती वडेवाले. तसे आता या विसोबाचे नांव " विसोबा खेचर जोडेवाले "असे ठेवायला हरकत नाही. आणि मिसळपावाबरोबर जोडे फ्री एकदम भन्नाट आयडिया.