मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

फोकाचे वळ

विनायक प्रभू ·
"मास्तर, खुर्चीत बसवत नाहीय्ये".- एक सन्माननिय मिपासद्स्य फोन वर म्हणाले. ढेकुण झालेत की काय? "नाही हो, फोकाचे वळ उठलेत. आय शप्पथ सांगतो आता परत कधी १८०+ शिट्टी घरात वाजवणार नाही. गाडाव झालो होतो. आता परत माणुस झालो.आतापर्यंत झाले ते साल्वेज कसे करायचे ते विचार करतोय." घरी जा. जाताना एखादी भेट घेउन जा. डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवा. बस्स. आणि ह्या पुढे तीला आवडणार्‍या विषयात गप्पा मारुन जमेल तेवढे खीखीखीखी खी करा. ती अगदी योग्य मार्गावर आहे. काहीही काळजी करु नका. तीला जे हवे आहे ते ती मिळवेलच ह्याची मला खात्री आहे. ह्या बाबत माझा अंदाज सहसा चुकत नाही. तुम्ही फक्त आई, बाबा व्हा.

फोक

विनायक प्रभू ·
तोच जुलै महीना, तेच पालक, तोच मी ,तेच तेच प्रश्न. एक शिक्षण सम्राटांनी माझ्या सर्व अटी मान्य करुन १० वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालका़करता २० कार्यक्रम ठेवले आहेत. कुठल्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता हे कार्यक्रम होणार होते.

केल्याने होत आहे रे आधी....

विनायक प्रभू ·
Congratulations You are too young for the job. But I have relied on my experience and instincts to select you. Do not disappoint me.- साहेब. Yes Sir, I will try my best.मी ____________________________________________________________ १९७२ साली World Health Organisation मधे निवड झाल्यावर साहेबांबरोबरचा पहीला संवाद. आई जाउन २० दिवस झाले होते. इंजीनियरिंग, पायलट वगैरे स्वप्ने राख झाली होती. इंजीनीयरीग चा वर्षाला ५ हजार परवडणार नव्हते, तर पायलट्चे महीना ५ हजार परवड्ण्याचा प्रश्नच नव्हता. बी.एस्.सी करता करता नोकरी करायचे ठरवले. आठ तासाचे कॉलेज, सहा तासाची नौकरी.

मिपा न आवडणार्‍यांकरता सप्रेम भेट...:)

विसोबा खेचर ·
राम राम मंडळी, मिपा हे संस्थळ सर्व मायबाप मिपाकरांचं अत्यंत ऋणी आहे आणि यापुढेही राहील. मिपाकरांशिवाय मिपाला शोभा नाही असेही आम्ही वेळोवेळी म्हटले आहे. परंतु असेही काही जण आहेत की ज्यांना मिपा आवडत नाही. हरकत नाही! या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडलीच पाहिजे असा काही नियम नाही. पण मग करायचं काय? मिपा तर काही बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना मिपा आवडत नाही त्यांचा पूर्णत: आदर करून त्यांना मिपा प्रशासनातर्फे खालील वस्तु सप्रेम भेट देण्यात येत आहे. ती घालायची आणि चालू पडायचं! :) काय म्हणता?

कुरुक्षेत्र

विनायक प्रभू ·
मास्तरने आजवर महाभारताबद्दल पुस्तकात वाचलेले आणि मोठ्यानी (बी. आर. चोप्रा) सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता. मिपावर आल्यानंतर त्याच्या भोळ्या मनाल तडा गेला. मिपा वरच्या काही सद्स्यानी त्याने ५० वर्ष बाळगलेल्या कल्पनांचा चुराडा केला. 'साडी सप्लाय", करुन गेला गाव आणि देवांचे नाव (पांडव जन्म) व इतर कल्पनांच्या मिपावरच्या खुलाशांनी मास्तरखंतावला. ___________________________________________________________ शेवटी अर्जुन कुरकुर करत एकदाचा युद्धाला तयार झाला.कृष्ण घाम पुसत आत्ता येतो म्हणून रथ आणायला गेला.अर्जुनानी धार लावायचा दगड घेऊन बाणांना टोकं काढायला सुरुवात केली.

मी नारकर

विनायक प्रभू ·
आयुष्यात प्रथमच हातात कॅमेरा नसल्याचे वैष्यम वाटले. जून २४ ते डीसेंबर २४ ह्या कालावाधीत बायको डोळ्यात तेल घालुन पहारा ठेवते. बेसीन वरचे ओडोमॉस, आफ्टर शेव क्रीम गायब होते. फक्त टुथ पेस्ट असते. मोज्याच्या गाठी मारुन ठेवल्या जातात. टीवी चा रीमोट लपवला जातो. टॉयलेट फ्लश झाले आहे की नाही ह्याची खात्री केली जाते. जाताना रुमाल्,मोबाईल्,छत्री परत आणा ची आठवण केली जाते. 'जेवलात का' चा फोन न चुकता असतो. अशाच एक सकाळी श्री श्री श्री तात्या महाराजांचा फोन आला. " मास्तर, आपल्याला ह्या भानगडीतले && काही कळत नाही. मी पडलो रांगडा माणुस. माझ्या कडे एक केस आहे. तुमचे क्षेत्र आहे.

काटकोन

विनायक प्रभू ·
Sir, I think your data is irrelevent in Indian weather conditions. मी What is your degree and experience and degree in the field sir?हॉलंडवरुन आलेला तज्ञ. Experience 1 year and degree 90 degrees १९९८ साली एका पंचतारांकित हॉटेल मधील एका कॉनफरन्स मधील प्रसंग. -------------------------------------------------------------------------------------------------------- १९९२ सालानंतर जागतिकरणाचे वार भारतात वाहु लागले. भारतिय कुक्कुट पालनामधे सुद्धा आधुनिकरण आले. ऑटोमेशन मुळे एका स्क्वेअर फुटात एकाच्या एवजी ३ कोंबड्या ठेवण्याइतकी प्रगती झाली.

रंक आणि राजा

विनायक प्रभू ·
१.धंदा करायची इच्छा बाळगर्‍याला आमंत्रण लागत नाही. गुडद्यात ताकद असली की पुरे. २. बँकेकडुन थोडे कर्ज घेतले की तो कर्ज घेणार्‍याचा त्रास असतो. भरपुर घेतले तर तो त्रास कर्ज देणार्‍या बॅकेचा असतो. ___________________________________________________________ नोकरीचा खूप कंटाळा आला. खणखणीत पगार, जेवणखाण, इतर सेवा मोफत असुनसुद्धा. असंख्य वेळा तेच तेच बोलुन अक्षरशः वैतागलेलो होतो. लोकांच्या 'टाइम्ज , मोशन, अ‍ॅक्शन 'चे प्रश्न संपायचेच नाहीत. दर दहा पेशंट मागे ४ जण 'वेळ' वाढवायच्या विनंती घेउन यायचे. ७ दिवसाच्या नोटीस ने नोकरी सोडली. साहेब वैतागला. 'स्टार बॅट्समन' रीटायर होणार होता.

पहीला पाउस

विनायक प्रभू ·
एक होता राजपुत्र. त्याला पहील्या पावसाचे खुपच आकर्षण होते. चाळीतल्या गजाच्या खिडकीवर उभा राहुन तो पहील्या पावसाची वाट बघायचा. राजपुत्राचे शेजारी पंजाबी घर होते. फाळ्णीत कराचीमधुन पळुन आलेले. त्या घरात एक परी होती. राजपुत्राची जिवलग मैत्रीण. परीच्या आईच्या हातात एक जाड सोन्याचे कडे होते. राजपुत्राला ते फार आवडायचे. परीच्या आईलासुद्धा राजपुत्रावर खुप लोभ होता. ११ इंच उंचीच्या चांदीच्या पेल्यात जाड जाड लस्सी मिळायची राजपुत्राला. 'जमाइ राजा' म्हणायची परीची आई. आभाळ भरुन आले होते. ढ्ग एकमेकांशी मस्ती करत होते. भर दुपारचा अंधार. उल्हासीत करणारा गारवा.