आजकाल आपल्या आयुष्यात अंतर्बाह्य बदल होतायत. इतके, की बहुतेक येत्या काही वर्षांमध्ये प्राथमिक शालेय पुस्तकांमधलं "अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत" हे विधान "अन्न, वस्त्र, निवारा या डिफॉल्ट गरजांसोबत काँप्युटर, हायस्पीड इंटरनेट आणि स्मार्ट्फोन या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत." असं बदललेलं दिसेल. या स्मार्टफोन्सच्या जगात वावरताना परवाच एका इसमाच्या हातात एक अत्यंत जुना, काळ्या रंगाचा, अँटेना असलेला वॉकीटॉकी सदृश्य मोबाईल फोन दिसला, आणि सहज डोक्यात आलं, या प्राण्याची (मोबाईलची) जन्मकथा काय असेल बरं?