मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक ) आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो.

वेलणकर चाफा

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी माझ्या अनेक आवडींपैकी एक म्हणजे बागकाम. त्यासाठी नेहमी वेळ मिळत नसला तरी सकाळचा चहा घेउन गॅलरीत झोपाळ्यावर बसणे आणि मेहनतीने लावलेल्या बागेतील झाडांची विचारपूस करणे ईतके तरी मी करतोच. कधीतरी विकांताला सगळी हत्यारे परजून कुठेतरी खुरपणे, खते देणे, दोर्‍या बांधुन वेल वर चढवणे , बांबूच्या कामट्या खुपसुन आधार देणे, कुंड्या बदलणे असे काहीतरी चालु असते. मग गॅलरी मातीने माखली की घरच्यांचा रोष होण्याच्या आत गॅलरी धुणे हेही त्यात आलेच. अर्थात माझे हात माखलेले असल्याने त्यातही मला मदतीला बायको लागतेच.

श्री गणेशोत्सव - अजुन काही ऐतिहासिक कविता

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे. सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ १. दामोदर हरि - वय २७, २. बाळकृष्ण हरि - वय २४ आणि ३. वासुदेव हरि - वय १८. दामोदर आणि बाळकृष्ण ह्यांनी गणेशखिंडीत रॅन्ड ह्या अधिकार्‍याचा वध केला.

श्रीगणेशोत्सव - एक ऐतिहासिक कविता

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड एक गोष्ट आजकाल प्रकर्षाने जाणवते आहे की आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते. विशेष करुन शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही समाज सुधारकांची विचारधारा अशी लुप्त होत जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.

२४० वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पराग१२२६३ ·
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेणतां वैरी जिंकती. नेणतां अपाई पडती. नेणतां संहारती घडती. जीवनाश. समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो. या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे.

अमेरिकेतील रस्ते -१

साहना ·
लेखनविषय:
तुम्ही अमेरिकेत कुठल्याही रस्त्यावरून प्रवास करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट आढळेल. बहुतेक रस्ते हे दुतर्फा असतील आणि मध्यभागी एक बहुतांशी पांढर्या रंगाची ओळ असेल जी लेन डिव्हाईड करते. अनेक प्रकारच्या ओळी इथे शक्य आहेत पण आम्ही ४ प्रकार पाहु. १. पांढरी अतूट रेखा पांढरी रेखा नेहमी एकाच दिशेने प्रवास करणाऱ्या लेन्स ना आखते. पण ती अतूट असली तर त्याचा अर्थ होतो कि तुम्हाला लेन बदलण्यास मनाई आहे. लेन बदलणे किंवा दुसरी लेन वापरून पुढील वाहनास "टेक ओव्हर" करण्यास मनाई आहे. टेक ओव्हर किंवा ओव्हरटेक ह्याला अमेरिकेत "पासिंग" म्हटले जाते. वळणे, पूल अश्या विविध ठिकाणी तुम्हाला हि ओळ सापडेल.

पाहिले म्यां डोळा..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. " "मरणात खरोखर जग जगते." कुणीतरी मरतं त्याचवेळी कुणीतरी जन्म घेतं.

ना. धों. महानोर-एक सांगितिक श्रद्धांजली

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांनी ना. धों. महानोरांबद्दल मिपावर सुंदर लेख लिहीला आहेच, पण तरीही राहवले नाही म्हणुन माझ्याकडुनही चार ओळी ======================================= ना. धों. महानोर गेल्याचे काल पेपरात वाचले. आणि सर्रकन मन भूतकाळात गेले. मी चौथी/पाचवीत असेन. नुकतेच रंगीत टि.व्ही. आले होते आणि त्यावर "चिंब पावसानं रान झालं आबादानी" गाणं लागलं होतं. सूर्/ताल वगैरे कळण्याचं वय नव्हतं तरीही ते धिन तांग तांग्,धिधिन तांग तांग डोक्यात बसलं. गाणं आवडुन गेलं. पुढे कित्येक दिवस तेच मनात घोळत होतं. मग रेडिओवर "मी काट्यातुन चालुन थकले" ऐकलं आणि तेही आवडलं.