लेखकमाहितगारयांनी सोमवार, 12/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पाकीस्तान कडून भारतीय पत्रकारांना इनफ्ल्युएन्स करण्याचे प्रयत्न कसे केले जातात याचा पाकीस्तानच्या माजी राजदुत अब्दुल बासीत याने उघड गौप्य स्फोट केला आहे.
लेखकअत्रुप्त आत्मायांनी मंगळवार, 11/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.
अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!
बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!
लेखकचांदणे संदीपयांनी शुक्रवार, 05/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच
एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या
लेखकखिलजियांनी शुक्रवार, 15/03/2019 या दिवशी प्रकाशित केले.
राखून ठेव दुधाचे थेंब तू
मज पाडसा पाजावया
रक्त माझे शोषलेस
काही नाही त्यास द्यावया
घास देई तू मजप्रती
दुध देते मी म्हणोनि
अर्थ नाही, व्यर्थ आहे
जीवन शिंगे असोनि
कामधेनु, गोमाता नावे
मज अनेक ती
भाकड पैदा होता
खाटीकास विकती
निचाहूनी नीच तू
तुझ्यासम कुणी नसे
धर्माचे स्तोम फक्त
अंतरी आत्माच नसे
विकशील का मुलीला ?
वांझ जर असेल ती
जरा खरचटता तिला
झोपही उडेल ती
वळू नको, भाकड नको
दुभती गाय पाहिजे
माग तू याच जन्मी
मग नरकात जायचे
(( सिद्धेश्वर विलास पाटणकर ))
लेखकखिलजियांनी शुक्रवार, 25/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपा प्रश्न होता माझा
"तू " अधिक " मी " किती ?
तू उत्तर दिलेस "दोन"
अंतर्मुख होऊनि शोधू लागलो
आपण आहोत तरी कोण ?
मला अपेक्षीत “एक " होते
आपल्यात मुळी अंतरच नव्हते
दोन देण्यामागे कारण काय होते?
जर तू माझ्यात होतीस
मग मी तुझ्यात का नव्हतो ?
आणि मी तुझ्यात नव्हतो
तर मी कुठे होतो ?
गणित सोपे जरी वाटले दुरून
अवघड झाले उत्तरावरून
का दिलेस तू विचित्र उत्तर ?
कुढत गेलो पुढे निरंतर
जवळ घेतला मद्याचा प्याला
शोधत गेलो मला स्वतःला
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
लेखकखिलजियांनी मंगळवार, 15/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना
जंगलावर राज्य करायचं असेल
तर खबरीलाल पोपट पाळून चालत नाही
त्यासाठी सिंव्ह पाळावा लागतो
हा सिंव्ह आपल्यासमोर उभा आहे
फक्त आपल्या किमतीचा भाव जुळावा लागतो
-----------कविता -------
धूर दिसे , काहीही नसे
पोपट करी जो त्रागा
शिकाऱ्यास तो असे भासवे
जणू तोच जीवनधागा
जंगल मंगल पोपटामुळे
पोपट किती रे चपळ
हा नसता तर अवघड असते
पेलले नसते जंगल
बित्तम्बातमी अशी आणतो
जंगलाची जणू नस जाणतो
पोपट पोपट करी शिकारी
काहीच सुचे ना त्याला
पोपट मारी अशी फुशारी
जणू हाच एकमेव जंगलाला
सिंव्ह बिचारा सुखी आपला
मालूम नसे हे त्याला
शिकार्यासी तो देव मानुनी
रोज पूजी तयाल
लेखकखिलजियांनी बुधवार, 25/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
" एक मराठा लाख मराठा "
पूर्वी गुंजला होता नाद
गिनीज बुकात नाव नोंदवुनी
मराठ्यांनी घेतली होती दाद
नव्हता कुणाचा अंकुश तेथे
नव्हते कुणीही नेते
गल्लोगल्ली येऊनि मिसळले
लाख लाख मराठे
काकासाहेब गेले बुडुनी (?)
झाला मोठा आघात
बंद पुकारला खरा तरीही
पण चढला हिंसेचा माज
मी हि मराठा तरी
भेदत आलो चक्रव्हुय ते सारे
शांततेतच खरा जोर असे
नको हिंसेचे वारे
मराठा असूनही आज मला
वाटत आहे लाज
पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा
नको आरक्षणाचा साज
सिद्धेश्वर विलास पाटणकर
लेखकखिलजियांनी सोमवार, 28/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
गणु अन गणूची मनू
लय भारी
गणू गोत्यात येई
मनू जाता माहेरी
मनू जाता येई मंजिरी
गणूची मंजिरी
मनू सारी
गणू नाही पाहिला
गणू नाही राहिला
गणूची येगळीच दुनियादारी
कधी मनू तर कधी मंजिरी
असे हजर सदैव दारी
गणु मग्न तो
गणु भग्न तो
गणु हासतो
गणु नाचतो
मनातल्या मनात
गणु धावतो
गणु पडतो
गणु चालतो
कधी खेळतो
आतल्या आत
गणूची यातना
भेदे मना
खेळ रंगला
खेळ भंगला
गणू संपला
पंचतत्त्वात
सिद्धेश्वर विलास पाटणकर