Skip to main content

राखून ठेव दुधाचे थेंब तू

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 15/03/2019 या दिवशी प्रकाशित केले.
राखून ठेव दुधाचे थेंब तू मज पाडसा पाजावया रक्त माझे शोषलेस काही नाही त्यास द्यावया घास देई तू मजप्रती दुध देते मी म्हणोनि अर्थ नाही, व्यर्थ आहे जीवन शिंगे असोनि कामधेनु, गोमाता नावे मज अनेक ती भाकड पैदा होता खाटीकास विकती निचाहूनी नीच तू तुझ्यासम कुणी नसे धर्माचे स्तोम फक्त अंतरी आत्माच नसे विकशील का मुलीला ? वांझ जर असेल ती जरा खरचटता तिला झोपही उडेल ती वळू नको, भाकड नको दुभती गाय पाहिजे माग तू याच जन्मी मग नरकात जायचे (( सिद्धेश्वर विलास पाटणकर ))

वाचने 1353
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया