Skip to main content

भाषा

दहशत - एका नव्या रूपात!

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/03/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

शब्दांची ताकद

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 27/02/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२-४३ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्‍याची( मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्‍यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला.

आम्हाला इंग्लिश येतंय

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/02/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे.

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 16/02/2016 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

शब्दकोश

लेखक सुचिकांत यांनी गुरुवार, 11/02/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीसाठीचा एक सुंदर उपक्रम. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल..... शब्दकोश प्रकल्प, इ. नववी :- _______________________ अक्षरनंदन शाळेतल्या इ. नववीच्या मुलांचा (मुली आणि मुलगे यांना सयुक्तपणे उद्देशून) ‘शब्दकोश प्रकल्प’ घेतला. वर्गातल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेपेक्षा अशा प्रकल्प /उपक्रमातून खरं शिक्षण होत असतं; हे जितकं खरं तितकंच शिक्षकालाही आपलं ज्ञान/आपलं अध्यापन/आपली अध्यापनाची दिशा तपासण्याची संधी यांतून मिळत असते. उपक्रमांतून मुलं जितकी जास्त अभिव्यक्त होत असतात तितकी परीक्षातंत्रातून क्वचितच!

मराठी भाषा दिन २०१६

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 29/01/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायमराठीच्या गौरवदिनानिमित्त आपण मराठी बोलीभाषा सप्ताह २१-२७ फेब्रुवारी दरम्यान साजरा करत आहोत. दर दहा मैलावर भाषा बदलते म्हणतात. मराठी भाषा तर दर प्रांती वेगळ्या लहेजात बोलली जाते. ऐकायला गोड वाटणाऱ्या आणि शब्दकळेने समृद्ध असणाऱ्या या बोली मराठी साहित्याला नेहमीच आगळा साज चढवत आल्या आहेत. भरुभरुन साहित्याचं देणं देत आल्या आहेत.किंबहुना प्रत्येक विषयातील शब्दाला पर्यायी मराठी शब्द देणे हे बोलीभाषेच्या अभ्यासाने नक्कीच साध्य होऊ शकेल. आणि म्हणूनच बोलीभाषा बोलली गेली पाहिजे,लिहिली गेली पाहिजे आणि वाचलीही.

राहील कुठे आता ही चिमणी?

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 28/01/2016 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
वारा वादळ हे जोराचे शाखा तुटल्या झंजावाते उडले घरटे फुटली अंडी सांगेल कुणाला व्यथा मनिची राहील कुठे आता ही चिमणी? उघडून जरी मी कपाट माझे बोलावत आहे तिजला नुसती चिव-चिव करते आहे नकळे मजला आणिक तिजला घरात परि ती कशी रहावी घरी वृक्ष तो आणू कैसा घरटे मग ती कोठे बांधिल आणेल कुठून ती पिले बिचारी सांगेल कुणाला व्यथा आपली राहील कुठे आता ही चिमणी? (महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित) २८/०१/२०१६

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट