विसराळूपणाचा आणि होणाऱ्या चुकांचा कंटाळा आलाय.
मी खूप विसराळू माणूस आहे. अनेक गोष्टी मी हमखास विसरतो. फोन/इंटरनेट ची बिल भरण्यापासून ते अगदी ऑफिसमधली टाईम शीट भरेपर्यंत अनेक गोष्टी आहेत .. शिवाय कामाच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी विसरत राहतो. अगदी बायकोने फोन केला, येताना अमुक एक गोष्ट घेऊन या तरी मी अक्षरशः ती घोकत घोकत गाडी चालवतो. मध्येच traffic मध्ये अडकलो तर ते सुद्धा विसरतो. पुन्हा घरी आल्यावर मला अशी अपूर्ण कामे करायला परत जावे लागते. त्यातून कटकटी होतात, भांडण होतात. काय करावं तेच समजत नाहीये. माझ्या पत्नीला काही जबाबदाऱ्या घे म्हटले तर तिच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
मिसळपाव