मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हायकूचा पहिला प्रयत्न !

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एक पक्षी अंधारात बरसणाऱ्या जलधारात घरट्यात एकटाच . . . . झाडावरचं एक फूल उमलून कोमेजलेलं झाडाच्याच पायाशी ...... पाहतो शून्यात मी आजकाल नेहमी विश्व निर्मिती तिथूनच ! जुळवले शब्द काही अर्थ उमगलाच नाही तरीही अर्थपूर्ण !

वाचने 5531 वाचनखूण प्रतिक्रिया 14

एस गुरुवार, 08/24/2017 - 08:16
चांगला प्रयत्न आहे. पण बहुतांशी कविता ह्या तीन ओळी कविता आहेत. हायकू नाहीत. हायकूमध्ये पहिल्या दोन ओळींत एखाद्या घटनेचं वर्णन असते आणि तिसऱ्या ओळीत एक कलाटणी असते जिच्यामुळे संपूर्ण हायकूचा अर्थ बदलतो. कवी हायकूमध्ये मनस्थिती किंवा भावना कधीही मांडत नाही. तो फक्त घटना मांडतो. आणि त्यामागे काय भावना असतील हे वाचकांवर सोडून देतो. अत्यंत सूचक असा हा काव्यप्रकार आहे. मराठीत आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी हायकू लोकप्रिय केल्या. ही एक प्रसिद्ध हायकू पहा: Old pond A frog leaps in Sound of water!

In reply to by एस

अत्रे गुरुवार, 08/24/2017 - 08:25
Old pond A frog leaps in Sound of water!
यातल्या तिसऱ्या ओळीतून या हायकूचा अर्थ कसा बदलतो ते नाही कळाले. मुळात या हायकूचा अर्थ काय आहे तेच नाही कळाले. थोडे विवेचन कराल का प्लिज? धन्यवाद.

In reply to by एस

माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 08/24/2017 - 09:20
माझ्या माहितीनुसार ५ ७ ५ हा जपानी हायकूचा नियम आहे हे अगदी खरे पण तो जेव्हा शिरीष ताईंनी मराठीत आणला तेव्हा हे नियम शिथील केले ... त्यांच्या पुस्तकातले हायकू सुद्धा याची साक्ष देतील ... मात्र यमक साधले गेलेच पाहिजे तीन पैकी कोणत्याही दोन ओळीत . आणि कमित कमी शब्दांत ... शेवटच्या ओळीत कलाटणी आवश्यक ...

In reply to by माम्लेदारचा पन्खा

एस गुरुवार, 08/24/2017 - 12:50
हो, ते ५-७-५ जपानीतून मराठीत किंवा अन्य भाषांमध्ये (इंग्लिश वगैरे) जसेच्या तसे ठेवणे कठीण आहे. त्यामुळे अक्षरसंख्या लवचिक ठेवली तरी चालते. पण तुम्ही म्हणता तसे यमक पाहिजे आणि शेवटी कलाटणी आवश्यक आहे. या विषयावर मायबोली आणि बहुतेक मिपावरही बरीच उत्तम चर्चा झाली होती. मला सापडल्यास देतो.

बाजीप्रभू गुरुवार, 08/24/2017 - 12:45
To be honest, असा पण काही प्रकार असतो आजच कळलं. हायकूची माहितीही मिळतेय या निमित्ताने. धन्यवाद!!

वकील साहेब Sun, 08/27/2017 - 12:34
मागे कधीतरी एकदा मटा की कोणत्या तरी पेपर मध्ये नियमित हायकू येत असत. तेव्हा त्याचा अर्थच उमगत नसे ( तो तसा अजूनही उमगत नाही म्हणा ) पण आत्ता त्याबद्दल वाचून उत्सुकता वाढली आहे. अधिक माहिती मिळाल्यास जाणकारांनी स्वतंत्र धागा काढावा. वाचायला आवडेल

पैसा Sun, 08/27/2017 - 22:03
तुम्ही कविता चांगल्या लिहीत असणार असे वाटते. तीन ओळीच्या मर्यादेत बांधून का घेताय?

एस Sun, 09/03/2017 - 09:43
या कवितेवर शिरीष पै यांची आठवण काढली होती. काल त्यांच्या निधनाची बातमी आली. शिरीषताईंना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_