शेतकरी बंधूंनो पाषाणभेद चा नमस्कार.
आज आपण 'आपली माणसं व त्यांची माती ' या कार्यक्रमात "कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय" याविषयावर तांबडवाडीचे प्रगतीशील शेतकरी श्री. भाऊराव गव्हाणे यांचे विचार एकणार आहोत.
पाषाणभेद: नमस्कार भाऊराव.
भाऊराव: रामराम.
पाषाणभेद: भाऊराव, आपण उस ह्या पिकाबरोबरच कपाशी हे मुख्य नगदी पिक घेतात. आपल्या भागात कपाशीवरील रोगांमध्ये 'कपाशीवरील बोंड अळी' ह्या रोगाची समस्या फार मोठ्या प्रमाणात उद्धभवते. याविषयी आपण काय सांगाल?
भाऊराव: कपाशीवर पाने खाणारी अळी, मर रोग, मावा, तुडतूडे, खोड पोखरणारे भुंगे तसेच बोंड अळी या रोगांचा प्रार्दुभाव होतो.