Skip to main content

विरंगुळा

मठ

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 11/04/2020 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी । गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥ अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो. एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्‍या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले.

मोगँबो - ७

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/04/2020 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
वर पाहिल्यावर ती कालची बाई जीना उतरत होती. खूप घाबरले. तीने मला पहायच्या आत पळायला हवे. मी स्टेशनच्या दारातून बाहेर पडले.आणि बाहेरच्या गर्दीत मिसळले. भुकेने अंगात त्राण नव्हते. चक्कर येत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती तरीही चालत राहीले. पळत राहीले. आणि या दादांच्या गाडीला धडकले." आशा सांगत होती . ऐकणारे नि:शब्द झाले होते.
मागील दुवा http://misalpav.com/node/46323 आशाचे बोलणे संपले . पण सगळे अजूनही त्याच शॉक मधे. सारंग ने ही शांतता भंग केली. ही जेंव्हा माझ्या बाईकला धडकली तेंव्हाच ठरवले आपल्याच वयाची आहे ही.

मुंग्या..

लेखक चिनार यांनी बुधवार, 08/04/2020 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं.

कार्यकारणभाव (लघुकथा)

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 06/04/2020 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग नुसता वैताग.. घरातल्यांनी नुसता वैताग आणला आहे. माणसाने बुद्धीने चालावे की अंधश्रद्धेने ? आयुष्याची तिशी ओलांडल्यावर पहिली कार घेणार आहे तर घरच्यांनी हे तारे तोडावेत ? बायको म्हणतेय "अहो.. माझ्या बाबांनी सुचवलं आहे, गाडीच्या क्रमांकाची बेरीज ७ यायला हवी. ७ अंक आपल्या दोघांकरिताही शुभ आहे" इकडे बाबा म्हणतायत "अरे गाडी घ्यायचीच तर किमान दोन महिने थांब. सध्याची ग्रहस्थिती तुला अनुकुल नाही".. निवृत्तीनंतर बाबांना ज्योतिषशास्त्राने तर सासर्‍यांना न्युमरोलोजीने पछाडले. तर आईची अजूनच वेगळी तर्‍हा "अरे आपल्या कुटूंबात कुणाला चार चाकी वाहन लाभत नाही रे.

मॅच-फिक्सिंग

लेखक कुमार जावडेकर यांनी शुक्रवार, 03/04/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
(क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा २००० साली दिल्ली पोलिसांना दिलेल्या हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये .) गुलमोहर सोसायटीच्या कमानीतून मी कमीत कमी वेगानं आत गाडी वळवली, जवळ-जवळ थांबलोच म्हणा ना. असं केलं ना की तिथे खेळणाऱ्या मुलांचं लक्ष वेधलं जातं (गाडीचा हॉर्न न वाजवताही. हे महत्त्वाचं. फक्त आपल्यात थांबायची तयारी हवी.).... बोलर आपण लांबच लांब आपला रन-अप धुंडाळत जातो. मिड-ऑफचा लाँग-ऑफ होतो आणि फॉरवर्ड शॉर्टलेगचा बॅकवर्ड. जेव्हा जेव्हा एखादी गाडी आत वळते, तेव्हा तेव्हा असंच फील्ड सेटिंग बदलतं.

मोगँबो - ६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 01/04/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची. तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. मी दारापाशीच उभी राहिले..
मागील दुवा : http://misalpav.com/node/46314 किती वेळ गेला असेल माहीत नाही. मी तशीच दाराच्या जवळ उभी राहिले. जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. दाराची कडी उघडल्याचा आवाज. हाच एक क्षण हीच एक संधी.

मोगँबो - ५

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 30/03/2020 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
तिथल्या माणसानेअगोदर मला जवळजवळ हाकलूनच दिले. बराच वेळ थांबल्यावर त्याला माझी दया आली असावी. त्याने आतल्या एका माणसाला विचारले आतल्या माणसाने परळ च्या पोस्ट ऑफिसात विचारा परळचे पोस्ट ऑफिस उद्या सकाळी उघडेल म्हणून सांगीतले. मी पुन्हा दादर स्टेशनवर आले. त्याच प्लॅटफॉर्मवर रंजन ताईची वाट पहात राहिले. रंजन ताई जीना उतरत कोणाबरोबर तरी येत होती.
रंजन ताईने मला हात केला. मीही केला. तीच्या सोबत असलेल्या दाट कुरळे केस , असलेल्या त्या काळ्या कुळकुळीत माणसाशी ती कसल्याशा कानडी भाषेत बोलत होती. तो माझ्या कडे बघत मान हलवत होता. रंजन ताईने मग माझ्याशी ओळख करून दिली.

मोगँबो - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 28/03/2020 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
तीने हात जोडले थ्यांक्यू दादा. दोन दिवस झाले काहीतरी खाऊन . गावाहून आले. हातातली पर्स कुणीतरी चोरली. येताना आणले होते ते थोडेसे पैसे होते तेही नाहीसे झाले. काल दिवसभर तशीच बसून होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही देवासारखे आलात. ती काय म्हणत होती ते आम्हाला अर्धवटच ऐकायला येत होते. तीची अवस्था बघवत नव्हती.आम्हालाच कसेतरी होत होते. भरपूर आजारी असावी . अंगात ताप जाणवत होता. डोळ्यातून पाणी वहात होते मधूनच हुंदके देत रडत होती. रडतारडताच बोलत होती.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46300 घरात मी, धाकटा भाउ लाला.

मोगँबो - ३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 27/03/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गाच्या दारातून एक त्यांच्याच वयाची असेल …. एक मुलगी आत आली. सावळीशी ,पण खारदाणा वाटावा इतकी भरपूर पावडर लावलेला चेहेरा. टाईट जीन्स वर तसलाच अर्धा टॉप. लालभडक लिपस्टीक. लांब मोकळेच असलेले केस. डोळ्यात भरपूर काजळ. " मित्रानो ही आशा. माझी धाकटी बहीण…. आशा हे माझे मित्र" सारंगने सगळ्यांशी तीची ओळख करून दिली. तीला पहाताच सगळ्यांचेच आ वासले गेले. जे घडतंय ते त्यांच्या कल्पनेबाहेरचेच.. मीनाचा चेहेरा तर एकदम पांढरा फटक्क पडला.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46262 नक्की काय चाललय कोणालाच कळत नव्हते.