दोसतार - ३२
डिटेक्टीव्ह घंटाकर्ण बरोबर होता. आम्ही तीघांनीही एकमेकांकडे पाहिले हसलो. हाताची घडी घातली तोंडावर बोट ठेवले. आळी मीळी गुप चिळी करत वर्गाकडे चालू लागलो.मागील दुवा http://misalpav.com/node/45891 शाळेत कसले ना कसले कार्यक्रम साजरे होतच असतात. त्याला दिन म्हणतात. कधी कसला दिन तर कधी कसली पौर्णिमा कधी कुणाची जयंती . निमीत्त काहिही असो कार्यक्रम ठरलेला असतो. सकाळी गेट जवळच्या मुख्य फलकावर आज काय आहे ते लिहीलेले असते. समजा जयंती वगैरे असेल तर ज्यांची जयंती असेल त्यांचा फोटो, त्याला हार .
मिसळपाव