दोसतार - ३९
एल्प्या सातवी ब ला समांतर रेषा शिकवायच्या म्हणून वर्गावर गेला. तो गेला . योग्या संगीता आणि जयु त्यांचे त्यांचे तास घेऊन आले.
तीघांचेही चेहेरे वेगळेच सांगत होते.....
मागील दुवा : http://misalpav.com/node/46136
शिक्षक दिनाला आठवीच्या बहुतेक सगळ्यांनाच काहीना काही शिकवायचे होते . त्यामुळे प्रत्येकाला हवा होता तोच विषय शिकवायला मिळाला होता असे झाले नव्हते. घाटे सरांनी आणि तारकुंडे बाईंनी त्या उलट ज्याला जे विषय कठीण जातो तोच शिकवायला सांगितला होत. योग्या खरे तर पी टी शिकवणार होता. पण त्याला सहावीच्या वर्गावर इंग्लीश चा तास घ्यायला सांगितला होता.
मिसळपाव