Skip to main content

विरंगुळा

पार्टी

लेखक निखिल माने यांनी रविवार, 22/03/2020 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
३१/१२/२०१९ वेळ:संध्याकाळ अजून घेणार आहेस नको, उद्या त्रास होईल काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता. अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील. हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता. जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत? अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती.

मोगँबो - २

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 22/03/2020 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा सारंग ना नेहमी असेच करतो. ढोलकीवाल्याला आणायला दुसर्‍या कोणाला पाठवलं असते तर निदान तो तरी मिळाला असत अगिटारवर. हा कार्यक्रम होऊन जाऊदेत मग बघु या त्याला. "अरे हे आपण दरवेळी ठरवतो आणि होतं काय! कार्यक्रम झाला की सारंगसाहेब अभिनंदन स्वीकारत बसतात. आणि आपण लोकांना दिसतही नाही. " मीनाच्या बोलण्यात तक्रारीपेक्षाही कौतूकाचाच सूर होता. तीच काय पण सारंग बद्दल कोणीही तसेच बोलायचा. होताच तसा तो.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46242 मीना च्या बोलण्यात तथ्य आहे या अर्थाने सर्वांनीच माना डोलावल्या.

कृतघ्न -5

लेखक बाप्पू यांनी रविवार, 22/03/2020 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी.

मोगँबो -१

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 17/03/2020 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
ए मोगँबो आला रे……….. मोगँबो आला रे. मागच्या बेंचवरून आवाज आला. वर्ग एकदम शांत झाला. आत्तापर्यंत चाललेली गडबड एकदम खेळताना दोन बोटे रोखून कोणीतरी स्टॅच्यू म्हणावे आणि ऐकणाराने जागीच आहे त्या अवस्थेत थिजून जावे तशी थिजून गेली. म्हणजे मीना आणि संध्या हातात कसलेसे कागद घेऊन एकमेकींचे पाठांतर तपासत होत्या. संजना बॅग मधून रंगीत कागदाचे तुकडे काढून चिकटवत होती. झिपर्‍या उर्फ पक्या प्लेअरवर गाणी मागे पुढे करत क्रम लावत होता. गण्या वहीत खर्चाची बिले आणि हिषेब जुळवत होता. हिषेब लावताना कसलीशी आकडेमोड करत होता. मधूनच तो कोणालातरी प्रश्न विचारत होता.

दोसतार - ४२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 13/03/2020 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
घण घण घण. तीन टोल पडले. दुसरा तास संपून तिसरा तास संपायची घंटा. आता तर परतीचा कोणताच विचारही करणं शक्य नाही. चालायचं तर फक्त वर्गाच्या दाराच्या दिशेने वर्गात जाण्यासाठी. एल्प्या पण फळा पुसून बाहेर येण्यासाठी निघालाय. मागील दुवा http://misalpav.com/node/46196 एल्प्या वर्गाच्या दारापर्यंत आलाय. त्याचे माझ्याकडे लक्ष्यही नाहिय्ये. मी त्याला काय तास कसा झाला हे खुणेने विचारले. पण त्याकडेही त्याचे लक्ष्य गेले नाही. एल्प्याचा चेहेरा इतका टेन्शन मधे असलेला कधीच पाहिला नव्हता. एल्प्याला काहीतरी जाम टेन्शन आलेय.

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!

दोसतार-४१

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/03/2020 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी डोळे मिटून घाटे सरां नी सांगितली असती तसे .काहितरी गम्मत सांगतोय तशा आवाजात भिंतीला गोष्ट सांगतोय . " खूप गोड गळ्याने भजने गायचा अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती होती." माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारतय. छे मुलांनी शंका विचारताना अशी सरांच्या खांद्यावर थाप मारायची नसते…. मागील दुवा : http://misalpav.com/node/46184 मी दचकून पाहिले, टंप्या माझ्या खांद्यावर थाप मारत होता. टंप्याला त्या शिपाईमामांच्या टोपीत मी अगोदर पटकन ओळखलेच नाही. म्हंटले कोण आल्ं हे. बाकाच्या मधोमध बसलो होतो म्हणून ठीक कडेला असतो तर दचकून पडलोच असतो. काय रे… काय झाले. काय झाले !

दोसतार-४०

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 05/03/2020 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
वाया नाही गेला. मी शिकले की त्यातून. मी घाबरले असते तर त्या पोरांनी रडवलं असतं मला." पण आता जर पुन्हा कधी अशा वर्गावर जायची वेळ आली तर अजिबात भिती वाटणार नाही." अरेच्चा हे पण आहेच की. शिकवताना आपण बरेच शिकत असतो.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46141 हे पण बरोबर आहे. आता चा तास एल्प्या घेणार. तो तासावर गेलाय.

ट्रम्प व्हिझिट पुणे

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 24/02/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

दोसतार - ३९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/02/2020 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
एल्प्या सातवी ब ला समांतर रेषा शिकवायच्या म्हणून वर्गावर गेला. तो गेला . योग्या संगीता आणि जयु त्यांचे त्यांचे तास घेऊन आले. तीघांचेही चेहेरे वेगळेच सांगत होते..... मागील दुवा : http://misalpav.com/node/46136 शिक्षक दिनाला आठवीच्या बहुतेक सगळ्यांनाच काहीना काही शिकवायचे होते . त्यामुळे प्रत्येकाला हवा होता तोच विषय शिकवायला मिळाला होता असे झाले नव्हते. घाटे सरांनी आणि तारकुंडे बाईंनी त्या उलट ज्याला जे विषय कठीण जातो तोच शिकवायला सांगितला होत. योग्या खरे तर पी टी शिकवणार होता. पण त्याला सहावीच्या वर्गावर इंग्लीश चा तास घ्यायला सांगितला होता.