शेपूच सँडविच

लेखनविषय:
लेखनप्रकार
सांप्रत काळ हा अत्यंत फालतुगिरीचा आहे. फेबु आणि तत्सम प्रकारांमुळे ह्या फालतुगिरीला अत्यंत चांगले दिवस आले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही गावाच्या गल्लीबोळात जाऊन तिथं मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थाचे व्हिडिओ बनवणे. सुरुवातीला उत्सुकता होती नंतर त्यातही साचलेपण आलं आणि आता पुढचा टप्पा..म्हणजेच कैच्या कै पदार्थ बनवणारे लोकं आणि ते खाणारे महाभाग आणि कळस म्हणजे त्यांचे व्हिडिओ बनवणारी जनता. काही खाद्य पदार्थ विक्रेते ह्या व्हिडिओ बनविणाऱ्या लोकांची लई बिना पाण्याने करतात..तरी पण हे थांबत नाहीत.

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखनप्रकार
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

जावे IT च्या डिपार्टमेंटा

लेखनविषय:
लेखनप्रकार
Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे?

शब्द कल्लोळ

लेखनविषय:
लेखनप्रकार
शब्द कल्लोळ! शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने, (अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई. गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत. अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.      'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!

द ब्यूटिफुल गेम

लेखनविषय:
लेखनप्रकार
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अ‍ॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अ‍ॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

Silver Trumpet and Trumpet Banner

ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

लेखनविषय:
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

अमू- OTT सिनेमा

लेखनविषय:
लेखनप्रकार
अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्
Subscribe to विरंगुळा