मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)

Bhakti ·
लेखनविषय:
सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन! 1 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

Bhakti ·
लेखनविषय:
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी 1 युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.

वेड्या आईची वेडी माया

रानरेडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा. खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता . रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची.

~ गंध धुंद ~

किल्लेदार ·
लेखनविषय:
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

अमेझॉन प्राईम सीरियल आस्वाद- 4 मोअर शॉट्स प्लीज !

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
#पुरोगामी सुधारणावादी लेखन #बहुजन हिताय बहुजन सुखाय ______ ४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !! ______ '४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श्वेता२४ ·
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .