चित्रकूटाच्या कारवी मठाचे महंत श्रीजगदेवदासजी मोठे सन्तसेवी म्हणून प्रसिद्ध होते. ते खूपच वैभवसंपन्न असल्यामुळे आपल्या जवळील वित्ताचा विनियोग अधिकाधिक साधुसेवेमध्ये कसा होईल याचाच विचार करायचे आणि तसेच आचरण ठेवायचे. दिवस असो का रात्र, त्यांच्या मठातील साधुसेवेमध्ये कधीच खंड पडला नाही.
एक दिवस काही तीर्थयात्री आणि साधु फिरत फिरत वृंदावनातून चित्रकूटला आले. त्या सर्वांची महंतजींच्या मठामध्ये चांगली सोय झाली. प्रसादाचं भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेमुळे त्या सर्वांनी महंतजींना अनेक धन्यवाद दिले. त्यांच्यातले वरिष्ठ साधुबाबा म्हणाले, "महंतजी, तुमच्यामुळे आमची इथे फार उत्तम सोय झाली.