
ती वृंदावनीच्या पायतळीची वीट, अन् सारवलेली, सुरेख, सुंदर नीट ।
रेखले त्यावरी प्राजक्ती स्वस्तिक, स्वस्थचित्त मी झालो नतमस्तक ॥ १ ॥

परसात बहरली हिरवी प्रसन्न बाग, ती छोटी झुडुपे धरून सजला काठ ।
देठास अननसा धरून सजले झुडुप, यापरते स्वागत कुठले देऊन गुच्छ ॥ २ ॥

हा रम्य किनार्यावरला तारा मासा, रुप सतेज त्याचे, सर्वांगावर काटा ।
देखणा शुभ्र तो, वाळूत सजलेलासा, कोवळ्या उन्हात निवांत बसलेलासा ॥ ३ ॥

पदचिन्ह तयाचे वाळूत उठले खास, ते टिपून चौकट-बद्धच केले त्यास ।
हे प्रकाशचित्र, शोभे प्रसन्न-सृजन, वालुका-चित्र जणू मनास देते आस ॥ ४ ॥

मृदू किती मुळातच, टोचे वाळूकण, रक्षणास त्याने रचले कवच कठीण ।
वाढता वाढता, फिरला, झाला शंख, झळकतो चमकतो रंगछटांत सुरेख ॥ ५ ॥
प्रसन्न आपटे ह्यांचे हे सृजन मला आवडले. भावले. तुम्हालाही नक्कीच आवडेल!
https://srujanashodha.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!
मिसळपाव
प्रतिक्रिया
@-प्रसन्न आपटे ह्यांचे हे
@-प्रसन्न आपटे ह्यांचे हे सृजन मला आवडले. भावले. तुम्हालाही नक्कीच आवडेल!>>> आंम्हाला अवडलेले आहेच... :-)
पण हल्ली आंम्ही प्रसन्न जीं च्या वेगळ्याच सृजनाच्या अपेक्षेत आहोत... ;-)
इष्टमित्रांचे प्रतिसाद अपेक्षीत... ;-)
पुन्हा एकदा स्पाचे फोटो पाहून
In reply to @-प्रसन्न आपटे ह्यांचे हे by अत्रुप्त आत्मा
पुन्हा एकदा स्पाचे फोटो पाहून आनंद झाला. तुम्ही रचलेल्या ओळीही अतिशय सुरेख.
प्रसन्नजींना रत्नांग्रीतच सृजनात्मक शोध लागला आहे असे ऐकिवात आहे.
नरेंद्र, लिहिलंयस खरंच मस्त,
नरेंद्र, लिहिलंयस खरंच मस्त, मजा आली
अवांतर - त्यावर मी “स्पा” म्हणजे प्रसन्न आपटेंना तसे विचारलेच. तेही अगदी सहजच हो, म्हणाले. - सध्या ते काय म्हणतात ना दिल दरिया...... अशी अवस्था आहे, मी त्याला तो कटोरी ब्लाउज टाईपचा शर्ट मागितलाय पँटीच्या दुकानातुन घेतलेला, अजुन हो नाही म्हणाला बघु काय होतंय ते.
असा कसा सहज हो म्हणेल ? अधिक
In reply to नरेंद्र, लिहिलंयस खरंच मस्त, by ५० फक्त
असा कसा सहज हो म्हणेल ? अधिक माहितीसाठी 'वेक अप सिड' बघा कोंकोना- रणवीरचा !!
मनापासून धन्यवाद
गोळे काका
मनापासून धन्यवाद
तुम्ही लिहिलेल्या ओळी फारच सुंदर
मस्त... स्पावड्याचा माझे गाव
मस्त... :)
स्पावड्याचा माझे गाव हा धागा माझ्या वडिलांनाही खुप आवडला होता. :)
तुम्ही लिहिलेल्या ओळी फारच सुंदर
फ़ोटोही अप्रतिम....
स्रुजन शोध
गोळे साहेब नमस्कार
आपण लिहिलेल्या काव्य पंक्ती मुळे prasann chya फोटोना उठाव आला
सृजन मनास भावले
अनिल आपटे
मस्त..
मस्त..
सर्व प्रतिसादक सुहृदांचे हार्दिक धन्यवाद!
सर्व प्रतिसादक सुहृदांचे हार्दिक धन्यवाद!
सुंदर
सुंदर