मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

भैरव ते भैरवि - सन्गित मैफिल

मॅन्ड्रेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, भैरव ते भैरवि हा कार्यक्रम सुन्दर ठ्सा उमटवून देणारा - अप्रतिम. शुभ कामना.

(विचारणा)

चेतन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वाती ताइंची संवेदना!! वाचुन नको त्या संवेदना!! जाग्रुत झाल्या. आणी पडले विडंबन लाल भडक तर्रीवाली तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या लाव्हारसा सारखीच दिसते.. लाल! तिखट रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी.. जिभेचे चोचले पुरवणारी.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे सात्विक बुळबुळीतपणच वाईट..! सोसत नसुनही खाल्ल्यावर वारंवार लागते ना घाई.. ही तर फक्त संपलेली... आतडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा होइल..

इतिहासकालीन नाण्यांचे प्रदर्शन

देवदत्त ·
माझ्या नाणेपुराण आणि नोटापुराणातील ज्ञानात थोडीशी भर टाकत आज मी ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमधे दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तिथे दिसले की आपल्या तसेच दुसर्‍या देशांतील जुनी(काही सध्याचीही) नाणीही ठेवली आहेत. कधीतरी एखाद्या किल्ल्यात किंवा राजवाड्यात फिरताना त्यांच्या संग्रहालयात जुनी नाणी पहावयास मिळाली होती. पण इथे तर त्यांचा सुकाळ होता. प्रत्येक नाणे हातात घेउन पाहता येत होते. तसेच इतर नोटाही तिथे प्रदर्शनास ठेवल्या होत्या.

गांधीवाद्याची थप्पड

भास्कर केन्डे ·
लेखनविषय:
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

अनाम वीरा ...

मैत्र ·
लेखनविषय:
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

सुनील मोहन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते. असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे. मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती.

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

बबलु ·
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

तो षटकार!!!

उम्मि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाळा-कोलेजात असताना, आम्ही क्रिकेट जाम खेळायचो बुवा! मी आणि माझे बरेचसे मित्र कोलेज सुटले रे सुटले कि क्रिकेट्साठी जमायचो अन अगदी काळोख होइपर्यत खेळायचो. जेवणाची वेळ, चहा याची जराही आठवण नसायची तेव्हा...... आमच्या खेळण्याच्या २ जागा होत्या, एक हायवे जवळ असलेला 'सर्विसिंग रोड', आणि दुसरी म्हंजे 'अलकनंदा मैदान'. तसा मी क्रिकेट्च्या सर्वच क्षेत्रात (फंलदाजी, गोलदाजी व क्षेत्ररक्षण) पांरगत होतो. म्हंजे रेकार्डच तसा होता आपला...समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे.

संगणक दुरुस्ती - मदत हवी आहे.

सखाराम_गटणे™ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा लैपटॉप V2000 compaq चा कुलिंग फैन बिघडला आहे. आवाज येतो आणि काही वेळाने (१० - २० मिनिटाने) लैपटॉप बंद होतो. मधुन अधुन हैंग होतो. वॉरंटी मध्ये नाही. May 2006 मध्ये घेतला होता. पुण्यामध्ये कुठे दुरुस्त करुन मिळेल?