तो षटकार!!!
लेखनप्रकार
शाळा-कोलेजात असताना, आम्ही क्रिकेट जाम खेळायचो बुवा! मी आणि माझे बरेचसे मित्र कोलेज सुटले रे सुटले कि क्रिकेट्साठी जमायचो अन अगदी काळोख होइपर्यत खेळायचो. जेवणाची वेळ, चहा याची जराही आठवण नसायची तेव्हा......
आमच्या खेळण्याच्या २ जागा होत्या, एक हायवे जवळ असलेला 'सर्विसिंग रोड', आणि दुसरी म्हंजे 'अलकनंदा मैदान'.
तसा मी क्रिकेट्च्या सर्वच क्षेत्रात (फंलदाजी, गोलदाजी व क्षेत्ररक्षण) पांरगत होतो. म्हंजे रेकार्डच तसा होता आपला...समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे. व आजुबाजुच्या क्षेत्ररक्षकांचा आवाज मा़झ्या कानावर पडे, "फक्त एकच रन दे रे, दुसरा नको." मी ही त्या सुचनेचे इमानेइतबारे पालन करत असे.
चुकुन जर गोंलदाजी हातात दिली गेली तर अंपायरची चांगलीच परेड घ्यायचो. तो बिचारा निमुटपणे कधी १ हात बाजुला, कधी २ हात बाजुला, तर कधि दोन्हि हात वर करायचा....
तसा मी जात्याच फंलदाज, त्यामुळे दुसरया किंवा तिसरया नंबरवर उतरायचो (अर्थातच शेवटुन....) आमच्या टिममध्ये दोघे-तिघे खंदे फलदाज असल्यामुळे आमच्यावर फंलदाजी करायची वेळच यायची नाही. (झाकली मुठ सव्वा लाखाची........)
पण एकुणच क्रिकेटवर आपल प्रेम होते बुवा! आपापसात खेळताना मी फंलदाजीवर जाम मेहनत घ्यायचो. अलकनंदाच्या मैदानात खेळताना फलदाज एका भितिकडुन फलदाजी करायचा, समोरची भिंत (७०-८० फुटावर असेल बहुधा) म्हणजे बोन्ड्रिलाइन. मात्र षटकार मारण्यासाठि चेंडु सरळ मारावा लागत असे. अन्यथा फक्त २ धावा मिळत.
आमच्यातले काही फलदाज सातत्याने हि भिंत पार करायचे. मी पण प्रयत्न करायचो, पण साला... जमायचेच नाही. अगदी जिवाच्या आकांताने बल्ला फिरवायचो पण बोल नेहमीच माझ्या बेटला गुंगारा दयायचा. कित्येकदा या भिंतीपासुन त्या भिंतिपर्यत चालत जायचो. त्या भितिचा खुप हेवा वाटायचा अन ती पार करणारया मित्रांचाही.
आमच्यामध्ये १ रिवाज होता, टीममधिल ज्या कोणामुळे आम्ही मेच जिंकायचो, त्याला समोरच्या टीमचे सर्व पैसे मिळत. कधि-मधि हे पैसे २-३ जणांमध्ये शेअरही होत.(एकापेक्शा जास्त मेचविनर असले तर). शक्यतो हे मेचविनर माझे २ लंगोटीयारच असयचे -- समिर आणी छोटि. (१ सचिन तर दुसरा वार्न) त्यामुळे माझी मजाच असायची. शक्यतो मेच जिंकल्यावर आम्ही चायनीज खायला जायचो. त्यावेळी या १००-१५० रुपड्याचं खुप अप्रुप वाटे.दर खेपेला वेगवेगळे पदार्थ......अजुनही चव रेंगाळतेय जिभेवर........................
आणि तो दीवस उजाडला, माझ्यातिल फलदाजाचा??? रविवारचा दिवस होता, आमची मेच होती, समोर १ चांगलीशी टिम होती. नाणेफेक जिंकुन आम्हि फलदाजी स्विकारली. पण तो दिवस वेगळाच होता. अवघ्या ३ षटकांत आमचे ६ खंदे वीर झाडाखाली (तम्बुत)परतले होते. १० षटकांची मेच होती, जेमतेम १५-१६ धावा झाल्या असतील तेव्हा आमच्या. आणि आउट होणारया फलदाजाने माझ्या हातात बेट दिली.(मनात पहिल्यांदाच भिती वाटत होती, कारण प्रत्यक्ष फलदाजीची वेळ आमच्यावर अभावानेच येइ). मी स्ट्राइक घेत होतो, मित्रांचा आवाज कानावर पडत होता.
"विकेट टाकु नकोस रे..........."
"ज्वालाला स्ट्राइक देत जा रे................"
"४०-४५ धावा झाल्या तरी चालेल रे, बघुया.............."
चालु असलेलं पुर्ण षटक निर्धाव गेले. माझी बेट, बोलला स्पर्श करु पहात होती. ५ व्या षटकात ज्वालाने स्ट्राइक घेवुन चौकार मारला आणि मनावरील द्डपण काहीस कमी झालं. पुढच्याच चेंडुवर ज्वालाने १ धाव घेतल्यमुळे मी स्ट्राइकवर आलो. बोलर फ़ास्टर होता.
त्याने पुढचा बोल टाकला..
बेटपिच डिलीवरि...............
मी बेट उचलली..........................
नेहमी रुसलेली 'बोलरुपी नववधु' माझ्या 'बेटवर' आदळली होती....अगदि घणाघाती....
मी धाव घेण्यासाठि धावलो, पहातो तर काय? अंपायरचे दोन्ही हात वरती....समीर, ज्वाला धावत माझ्याकडे आलेले ....
"मैदान पार केलस रे उम्मि..शाबाश...असाच खेळ".
(मंडळी विचार करा, काय अवस्था झाली असेल माझी? झाडाखाली परतलेले मित्र पाठ थोपटुन जात होते....आज मी धन्य झालो होतो.क्रिकेट जगतातिल शहेनशहा(आपल्या तेंडल्या हो...) १०० रन्स पुर्ण झाल्यावर वरती पहातो ना, अगदि तोच थाट व भावना मनात उमलत होत्या.)
षटकातिल पुढ्चे चेंडु निर्धावच गेले. मात्र त्या दिवशी पुर्ण १० षटके खेळलो, नाबाद.....
छोटि नंतर सांगत होता, वीसेक धावा केल्या असतिल मी. आमच्या संघाची धावसंख्या झाली होती -- ५२.
ती मेच तर आम्हि जिंकलोच पण त्या मेचचा विनरहि मी ठरलो होतो. मेचविनरचे मिळालेले पैसे व जोडीला स्व:ताकडचे ५० रुपये आणखी टाकुन आमची स्वारी चायनिजकडे वळली, त्यादिवशी माझ्याबरोबर नेहमीचे 'मेचविनर' तर होतेच पण आजतागायत कधीहि मेचविनर न झालेलेही दोघे-तिघे होते,
खुप आंनद होत होता आज ओर्डर देताना........
आजही तो दीवस जश्याच्या तसा लक्षात आहे.............
(त्यानंतर मी मारलेला कोणताही चेंडु त्या भिंतीला पार करु शकलेला नाहि, पण म्हणुन फलदाजी करणं सोडतोय थोडाच. हि...हि..हि....)
अष्टपैलू क्रिकेटपट्टू,
उम्मि.....
वाचने
4243
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
ही ही ही...
वा मजा आली
In reply to वा मजा आली by घाशीराम कोतवाल १.२
>>मला सुधा
In reply to >>मला सुधा by सखाराम_गटणे™
>>मला फक्त
In reply to >>मला फक्त by घाटावरचे भट
>>बॅटिंग
In reply to >>बॅटिंग by सखाराम_गटणे™
>>रोम वॉज
In reply to >>रोम वॉज by घाटावरचे भट
तमसो मा
In reply to >>रोम वॉज by घाटावरचे भट
>>>वाढत्या
In reply to >>रोम वॉज by घाटावरचे भट
-- अनुभवाने
In reply to -- अनुभवाने by सखाराम_गटणे™
मग घ्या
सहमत
In reply to सहमत by टारझन
बाकी मला
In reply to बाकी मला by अवलिया
वेगवेगळ्य
In reply to बाकी मला by अवलिया
:ड
धन्यवाद
पुन्हा क्रिकेट?
In reply to पुन्हा क्रिकेट? by कपिल काळे
नाही... बॅट
बॅटींग अणी
In reply to बॅटींग अणी by अनिल हटेला
फिल्डींग