मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिभा

दर्शन -- भक्तिगीत

कौस्तुभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग ... ऐकीयले जनाघरी जाते तू ओढीले नरहरी सोनाराचे दागिने करीले देई हाक येथ पहा, लेकरु तुझे रे ॥२॥ पांडुरंग पांडुरंग ... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तूच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग ... भक्तिगीत --कौस्तुभ

कवितेच्या झाडावर...

अशोक गोडबोले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी गणमात्रांच्या नाजूक वेली वेढीतात तिजला यमकांची चरणात पैंजणे छंद मधुर मेखला भव्य कल्पनाविलासापुढे नीलांबर ठेंगणे काव्यफुले फुलल्यावर लाजे पुनवेचे चांदणे सुधारसाशी पैज लाविती नवरस अभिमाने विश्वात्मक हा विशाल हृदये वसतो प्रेमाने षड्ज लावुनी मोर नाचती प्रीती गती संगम कोकिळकंठामधुनी निघतो नभचुंबी पंचम अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता --अशोक गोडबोले, पनवेल.

शर्यत

अरुण मनोहर ·
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून

पावसा!

ऋषिकेश ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश

पाहिले मी !

कौस्तुभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाहिले मी पाचोळ्याला फांद्याना लटकून रडताना,जगताना तर कधी फुलण्या‌आधी कळी गळून पडताना ऐन बहरात फुलांचा रंग उडून जाताना अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला गंध ओवळून टाकताना पाहिले मी डेरेदार वृक्षाखाली सावली हरवून जाताना तर कुठे इवल्या रोपाखाली वारूळ उभे रहाताना वादळाशी झूंज देत इतिहास नवा रचताना तर कुणी अलवार झूळकीसरशी मुळासकट पडताना पाहिले मी देवळात दगडावर अभीषेक दुधाचा होताना तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात अन्कुर उद्याचा फुटताना खडकाळ बंजर जमीनीवर नांगर (प्र)यत्नाचा फिरताना तर कुठे नर्मदेच्या तीरावर गोट्यांचे पीक येताना पाहिले मी हिमालयाला नतमस्तक धरेसमोर होताना तर कधी इवल्या शीळेला मिज

(...मी खरा की तू खरा?)

चतुरंग ·
लेखनविषय:
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी!

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा

भडकमकर मास्तर ·

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

भडकमकर मास्तर ·
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष " नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? " " काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? " अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो...