Skip to main content

प्रतिभा

"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/07/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत.

(लाडू सांगे...)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 19/07/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुरे आता, बास । कवितांची रास । किती किती त्रास । कवींचा या । । पाहवेना नेत्री । रात्री अपरात्री । कवितांना कात्री । लागलेली । । पुरे दादागिरी । आता माझी बारी । वदतो अंतरी । विडंबक । । इरसाल स्वारी । बसे खाटेवरी । पुंगी वेळेवरी । वाजवाया । । 'काळा' की 'कावळा' । 'प्रेम' की 'पाचोळा' । भरल्या मी चुळा । कल्पनांच्या । । कवितेचा घास । करुनिया खास । सोडला उपास । लेखनाचा । । ओळींना वळण । शब्दांचे दळण । करितो कांडण । कवितांचे । । शिव्यांचाही भार । घेई शिरावर । खरा गुन्हेगार । कवितेचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळावं ?

ने मजसि ने...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/07/2008 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख यापूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आहे. परंतु आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या गुरुजींना आदरांजली म्हणून हा लेख मला मिपावरही टाकावासा वाटला म्हणून तो मी टाकत आहे. आपल्यापैकी काही मंडळींनी हा लेख वाचलाही असेल. असो, आजचा दिवस थोडासा बेचैनीतच गेला! बाबूजींना या लेखाद्वारे माझी विनम्र आदरांजली! नमस्कार मंडळी, आज गुरूपौर्णिमा. माझी काही दैवते आहेत. त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. बाबुजी(स्व.सुधीर फडके), अण्णा(भीमसेनजी) ह्या माझ्या प्रातःस्मरणीय व्यक्ती. २००२ सालची गुरूपौर्णिमा. सकाळची वेळ. गुरूपौर्णिमेनिमित्त दादरला बाबुजींना भेटायला जायचे होते.

(बैल)

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 18/07/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच बैल असतो बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो ;) बायकोच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो. आपण सगळेच बैल असतो बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी अंघोळीला आपली पाठ चोळावी कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो :( आपण सगळेच बैल असतो आपल्याला आपण फसवले गेलो आहोत याची काही लाज नसते ती जाणीवच थिजलेली असते उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते बायको माहेरी गेली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या बायकोच्या शोधात असतो आणि नव्या बायकोकडे गेलो की जुनी कशी चांगली होती (?!?!?!) याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो

खाली-वर, खाली-वर

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 17/07/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
. उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट अलगद सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी बोट............... आता दिसतही नाही : मी तिथेच............. बोटाकडे बघत खाली-वर, खाली-वर ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८

भटका कुत्रा

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 17/07/2008 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
भटका कुत्रा . पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने मात्र तिच घर उभारताना आम्हाला पाहायला मिळाल. तिला पिल्ल होणार होती.. आम्ही सगळी बच्चे कंपनी खूप आतुरतेनं त्या येऊ घातलेल्या सवंगड्यांची वाट बघत होतो..

कार्यालय

लेखक विनोद इन्गळे यांनी बुधवार, 16/07/2008 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिल नाही कुणाचही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय

(तू)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 15/07/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;) तू भयकथेगत नकोस येऊ मी त्या पालीगत थरथरतो... तू 'इतिहास' होऊन नकोस वाहू 'बे-भान'पणे मी भरकटतो... तू 'वैशाख फळ' होउन जवळ राहा मी ओरपून खाईन असा... तू 'गजल' एखादी होउन ये मी विडंबनात नाहीन असा... चतुरंग

मोघेकाकू..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 15/07/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा." "छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!" मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या.

(मोजलेली 'मापे')

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 15/07/2008 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;) मोजण्याची माप पहिली खेप आहे त्यात अन आखूड मेला टेप आहे कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! 'मोजमापे' घेतली का मी चुकीची यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे? मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! चतुरंग