मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसा!

ऋषिकेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश

वाचने 4465 वाचनखूण प्रतिक्रिया 13

धनंजय Sat, 07/05/2008 - 17:36
सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

मदनबाण Sat, 07/05/2008 - 20:21
फारच सुंदर कविता.. वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा हे फार आवडल.. (ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

प्राजु Mon, 07/07/2008 - 01:09
हृषिकेश, खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे. खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश Sun, 07/06/2008 - 22:33
धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा, सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू Tue, 07/08/2008 - 01:45
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वावावावा! फार आवडले. (बालक)बेसनलाडू

ऋषिकेश Wed, 07/09/2008 - 18:47
प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश