तुला खात्री आहे?
भोवती बघ..
थोडं तु खाली बघ
इथे दिसणारे चेहरे बघ...
तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं?
हे तुझ्या भोवतीचे मित्र...
पण हे आहेत का "खरे" मित्र?
ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम?
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?
तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस
त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस
भोवती बघ.. अगदी नीट बघ
फक्त दोघे..तु आणि मी
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?
माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि...
हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात
भोवती बघ.. अगदी नीट बघ
सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ
तुला खात्री आहे?
मिसळपाव