Skip to main content

(...मी खरा की तू खरा?)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 03/07/2008 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी! सार्‍याहुनी मोठ्या जरा... मी पगारी; तू करारी - मी खरा की तू खरा ? बॉस माझा, आणि त्याचा...याचसाठी झुंजती याचसाठी 'चॅट'मारी - मी खरा की तू खरा ? बातम्या देशील माझ्या बॉसला माझ्या परी.... व्हायची 'खानेसुमारी' - मी खरा की तू खरा ! बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे... 'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा ! कोण जाणे काय झाले? बॉस मी झालो अता - - प्रश्न मी आता विचारी - मी खरा की तू खरा ? चतुरंग
लेखनविषय:

वाचने 2507
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

रंगाशेठ एकदम झकास विडंबन.. सगळ्याच द्विपदी आवडल्या.. (सध्याचा बॉस) केशवसुमार स्वगतः मी खरा की तो खरा ?

आवडले;पण काही द्विपदी संदिग्ध वाटल्या.अर्थाच्या दृष्टीने गझल,विडंबन किंवा कोणतेही काव्य - जितके स्पष्ट,सहज तितके जास्त अपीलिंग :) विडंबन बाकी ओघवते झाले आहे.शब्दरचनेत कोठेही ओढाताण नाही,लय सांभाळली आहे.कार्यालयीन स्लँग्जचा वापर आणि एकंदर वातावरणनिर्मिती विशेष वाटली. कीप इट् अप् (कामगार)बेसनलाडू

बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे... 'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा ! रंगा, हे मस्त! :)