Skip to main content

जागो मतदार प्यारे

लेखक अनिरुध्द यांनी गुरुवार, 27/11/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आल्या आल्या निवडणूका जागा हो मतदारा आश्वासनं अन् सुविधांच्या बरसतात बघ धारा अनेक व्यक्ती अनेक पक्ष जनतेकडे ना कुणाचे लक्ष सत्ता, पैसा अन् खुर्ची मिळविण्या करीती मखलाशी शिवसेनेचा शिववडापाव अन् काँग्रेसचे कांदे-पोहे भ्रमिष्ट झाली जनता आता खावे काय हा प्रश्न पडे शिवसेनेचा प्रचार मोठा ठरविण्यास तो बर्गर खोटा बरीच वर्ष दुर्लक्षित होता भाव येई एकदम आता बघुन सेनेची युक्ती काँग्रेस काढे नवीन क्लूप्ती वडापाव तर रोजचाच आहे आम्ही आणतो कांदे-पोहे मैदानात घेतली उडी करण्या आता कुरघोडी बघता यांचे माकडचाळे जनता ही झाली वेडी म्हणून म्हणतो मतदारा आता तरी हो जागा मतदानाचा हक्क बजावून दाखवून दे यांना 'जागा'
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1174
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया