Skip to main content

प्रकटन

मला इश्वर दिसतो आहे !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 24/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला इश्वर दिसतो आहे , पंख पसरलेल्या पक्षासारखा मुक्त.. तळ्यातल्या सुंदर कमळाप्रमाणे अलिप्त... आम्रवनात कुंजन करणा-या कोकीळे प्रमाणे आनंदी अन अथांग आकाशा प्रमाणे......... अनादी...... मला कळून चुकल आहे कि, जीवन हाच एकमेव इश्वर आहे.. म्हणुनच,....
Taxonomy upgrade extras

पुण्य स्मरण

लेखक मेथांबा यांनी मंगळवार, 24/02/2009 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
साने गुरुजी खुप भाउक माणुस. गरिबांचं दु:ख बघवलं नाही म्हणुन त्यानी आत्महत्या केली. मी कधीही त्यांचं आता उठवु सारे रान एैकलं की मला त्यांची आठवण येते.

मामाजी

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 24/02/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे. मामाजी: अरे कोण आहे रे तिकडे. जरा त्या ऑस्कर कमीटीच्या अध्य्क्षाना जरा फोन लाव. असिस्टंटः का हो सर? मामाजी: तुला रे कशाला चौकशा. धु म्हटले का धुवायचे. आणि मी कितीही गुप्त ठेवले तरी ते तुला कळणारच आहे. असिस्टंटः (हसत) करतो सर. असिस्टंट फोन लावतो. मामा़जी: मी मामाजी बोलतोय. काय पोझिशन आहे ऑस्कर ची. त्या डॉग ला काही मिळणार आहे की नाही. अध्यक्षः दोन मिळायची चान्सेस आहेत. मामाजी: दोन ने काय होते आहे. चांगली आठ मिळायला हवी. 'बापाची' आज्ञा आहे. त्यात दोन तरी भारतीय असायला हवेत. अध्यक्षः आता ते माझ्या हातात नाही. मामाजी: मला शहाणपणा शिकवु नका.

सूर्यास्त

लेखक जयवी यांनी सोमवार, 23/02/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
का लागली दृष्ट तेजोनिधीला अवेळी कसा आज सूर्यास्त झाला अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा शरण भास्करा तू कसा या निशेला बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली अंधार डोही धरा दीनवाणी कशी भासते आज केविलवाणी कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची आस वेड्या जीवाला नव्याने उषेची जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

तहान

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
हं... इथे खण.... खणत रहा ...हा भूतकाळ आहे .... तो तुला खणायचाय... खणताना निघतील अवशेष आठवणिन्चे... यशाचे .. चुकांचे... हवेसे... नकोसे लक्षात ठेव, .... अवशेषामधे मन गुंतवायचं नसतं.....! पुढे लागतील थडगी, सोडून गेलेल्या आप्तांची... दगलबाज मित्रांची, लक्षात ठेव, ... थडग्यांपुढे फुलेच ठेवायची..... मन नाही ! खण .... खणत रहा ...... खणता खणता संपेल सारं .. थकून पाहशील अवती भवती .. .... तहानलायस ..! उतर .. या खोल भूतकाळाच्या गाभा-यात .. शोध मूळ जाणीवेचा निर्मळ झरा.. आता या झ-यालाच वर्तमानकाळ बनव अन् पडून रहा, ... या झ-याकाठी .. निपचित ...! -- सागरलहरी
Taxonomy upgrade extras

घनगंध

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मुग्ध वेड्या चान्दणिचे , गीत हे हळुवार आहे घाव लेवुन तव स्मृतींचे , मम मनी फुलबाग आहे... हासणारे नेत्र माझे, अश्रुना आव्हान देती आज दाटे या उरी हा, कोंडला नि:श्वास आहे .. माळलेली तू फुले मज, गंधुनी मी धुंद होते, कायेस या अजुनी तुझ्या रे, देहिचा घनगंध आहे .... -- सागरलहरी
Taxonomy upgrade extras

तुझा सूर्य मला उसना दे !

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यागता तुझा सूर्य मला उसना दे, खरंय की, तूच वाट चुकलेल्या पान्थस्था सारखा आलास, आशा होती तुला अंधारल्या माळावरच्या मिणमिणत्या कन्दिलाचीच फक्त ...... अरे पण माझ्या कड़े तर सूर्य होता ! अर्थात .. तुला हे ठाऊकच नाही म्हणा. अरे, अनंत कालपटावर स्वतेजाची पखरण करणारा माझा सूर्य ..... तो असंख्य जीवनांचा जनक ! त्या चन्डान्शुच्या प्रखरतेने निथळतानाही वाटे.... त्याचा अनादी जीवनांश तो किरणकरांनी आम्हाला देतोय. अभ्यागता ! पण हां इतिहास झाला. आमचा सूर्यही आता मळल्यासारखा झालाय बघ. वाटते कळिकाळपटाशी झुंजत तो श्रांत झालाय ! त्या हिरण्य गर्भावर चढलीत जळमटे ....
Taxonomy upgrade extras

अंतीच्या कळान्चे | जिवाला लागीर |

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंतीच्या कळान्चे | जिवाला लागीर | सोसेना उशीर | काही केल्या || भयकारी चित्र | दिसते सर्वत्र | घरदारा पुत्र | धूसरती || धुमस ही कंठी | नाही येत ओठी | राहिल्या त्या गोष्टी | सांगायच्या || सांगितल्याविण | समजावे मन | उतरावे ऋण | कसे आता || पिन्डाला वेढीन | गुज सुचवीन | मग घास देइन | काक मित्रा || - सागरलहरी
Taxonomy upgrade extras

(काव्यप्रसववेदना)

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 20/02/2009 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
'आपला अभिजित' यांच्या ह्या कवितेच्या प्रेरणेने खालच्या ओळी रखडल्या... जमल्याच असतील असे नाही. तसेच या ओळींना शिर्षक काय द्यावे ते पण कळले नाही...
Taxonomy upgrade extras

मागवेन व्हिस्की, मागवेन ब्रॅंडी..!

लेखक उपटसुंभ यांनी शुक्रवार, 20/02/2009 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
(सानेकर, बांदोडकर वगैरे प्रभृतींची क्षमा मागून) मित्र - मागवेन व्हिस्की, मागवेन ब्रॅंडी, आणिक गावठी खास हातभट्टीची कधी कुठे कसा तुला सांग पाजू, वाट पाहतो मी रविवारच्या सुट्टीची कामाला विसर तू, बस बरोबर तू. माझा पेग तू घे, तुझा पेग मला दे. मी - कोणता हा गुत्ता हायवेवाला तुझ्यासवे मजला माहिती झाला सुने सुने होते किती मन माझे फ्रेश झाले पाहुनी ही मधुशाला चकण्याची मज आता कळते मजा मित्रा मी आभारी आहे तुझा सांगतो मी खरेखरे, एवढाच पेग पुरे तोल जातो धरा रे. कधी