Skip to main content

प्रकटन

जाधव सर

लेखक प्रमेय यांनी शनिवार, 07/03/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
पल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात. पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’. माझ्या मोठ्या भावाची ७वी. या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले.

(बोल)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं? नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं! मैत्रिणींना सांगायची ती दुसर्‍यांची लफडी नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा? मला म्हणे फोनवर बोलता येत नाही कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही? म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते! काय समजू मी की मेली तुझी भुक आहे? अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ? प्रेरणा: जागुताईंचे बोल

जुहू चौपाटी, सोबत मै शायर बदनाम चे स्वर आणि मी एकटाच..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 07/03/2009 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज बर्‍याच दिवसांनी संध्याकाळची सवड भेटली.. पोटापाण्याच्या व्यवसायाचं एक महत्वाचं काम होतं अंधेरीला. ते थोडं लौकरच उरकलं. किती वाजले होते माहीत नाही, परंतु आठ वाजून गेले होते. थोडी सवड होती.. डोक्यात 'मै शयर बदनाम..'चे स्वर रुंजी घालू लागले.. तसाच तडक निघालो आणि जुहू चौपाटीवर पोहोचलो. त्या आधी त्याच्या बंगल्याभोवती खुळ्यासारखा थोडा वेळ घुटमळलो.. आणि समोरच असलेल्या चौपाटीच्या पुळणीवर जाऊन बसलो..चौपाटी नेहमीप्रमाणेच गजबजली होती.. पाणीपुरी, भेळपुरी, अन् काय काय! मी मात्र तिथे एकटाच बसलो होतो.

(पाहिजे वीकांत मोठा)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

प्रवास

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 06/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास मन भिजवून गेल्या कोवळ्या स्मृतींच्या लाटा अजूनही चालते मी पूर्वसंचिताच्या वाटा रित्या आयुष्यासारखी वठलेली झाडे कुठे, कुठे पळसफुलांनी सजलेल्या रानवाटा कधी चालता चालता अडखळती पाउले, कधी मन ठेचाळते, सलतो उरात काटा किती वळणे घेऊन जाऊ किती मी दुरून? तुझ्या घराकडे जाती ओळखीच्या सा-या वाटा वेड्या मना, अविचारी, उतावीळ होऊ नको, तुझ्या क्षणिक मोहाचा उगा होईल बोभाटा नाही ठाव किना-याचा, असा प्रवास हा माझा, शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा क्रान्ति
Taxonomy upgrade extras

एक विचार... :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 06/03/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार - बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे! जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्‍हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे! यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर.

ट्रीट्मेंट

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 06/03/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
You need to go out and have blast mate. You are currently drowning in cesspool of self pity mate. 'सावल्यांच्या झळा या मालिकेतल्या कथा नायकाला त्याच्या कंपनीच्या सायकीऍट्रीस्ट ने दिलेला सल्ला. ऑगस्ट २००८ मधे ह्या माझ्या मित्राला भुतकाळाचा खुपच त्रास व्हायला लागला. त्याचा आउट्पुट वर परिणाम झाला. 'संवेदनशील' पोस्ट वर असलेल्या माणसाचे सुरु झालेले हाल कंपनीला परवडणारे नव्हते. But to do that you need to connect with somebody positive from your past. Without that even I can not help you mate. ऑस्ट्रेलीयन असलेल्या ह्या डॉक्टरने सोशल साईट चे रेकमेंडेशन सुद्धा केले. कुठेतरी कळाले मिसळ पाव बद्दल.

जगणं !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 06/03/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे तिकडे बघताना जाणवतं की वाहत राहणे हा पाण्याचा गुणधर्म, जेथे पाणी थांबले तेथे डबके तयार होतं व चांगले साफ पाणी देखील खराब होतं. असाच काहीसा गुणधर्म जिवनाचा पण आहे, जिंदादिलीने जगणे म्हणजे जिवन, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस. जे आहे त्यात संतुष्ट राहणे चांगले आहे पण त्याच बरोबर काही तरी नवीन करण्याची जिद्द / ललक मनामध्ये असणे म्हणजे जिंदादीली, स्वप्न असावीत प्रत्येकाची, मनामध्ये एक धेय असावे, एक मुक्काम आपल्यासाठी ठरवलेला असावा तरच जगण्यात काही तरी मजा आहे, उगाच जगायचे म्हणून काय जगायचे ?