Skip to main content

मला इश्वर दिसतो आहे !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 24/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मला इश्वर दिसतो आहे , पंख पसरलेल्या पक्षासारखा मुक्त.. तळ्यातल्या सुंदर कमळाप्रमाणे अलिप्त... आम्रवनात कुंजन करणा-या कोकीळे प्रमाणे आनंदी अन अथांग आकाशा प्रमाणे......... अनादी...... मला कळून चुकल आहे कि, जीवन हाच एकमेव इश्वर आहे.. म्हणुनच,.... मी वृ क्षांची पूजा करतो. अन पूजा करतो , पर्वतांचीही..... मी पूजा करतो नद्यांची.... अन पूजा करतो , गगनातील ता-यांचीही...... मी इश्वराच्या चरणावर वाहिल्या जाणा-या, फुलांचीही पूजा करतो.... जे जे चैतन्यशील आहे , त्या सा-यांची मी पूजा करतो.......कारण.. जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे इश्वरत्व आहे अशी माझी स्रद्धा आहे अन तरीही लोकं मला नास्तिक म्हणतात.........!!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1167
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया