Skip to main content

प्रकटन

कार्तिकीला आक्षेप का?

लेखक अन्वय यांनी सोमवार, 09/02/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांना, कार्तिकी गायकवाड महाविजेती होणारच नाही. प्रथमेश किंवा आर्या या दोघांपैकी कुणीतरी एक होईल, असे वाटत होते. परंतु ऐनवेळी वेगळाच निकाल लागल्याने या सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या. त्यामुळे यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत. यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा. तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही. प्रथमेश आणि आर्या दोघेही समजदार आहेत.

कवि भूषण

लेखक शिशिर यांनी रविवार, 08/02/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही. कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत. कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे.

मैने प्यार किया

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

घडतंय बिघडतंय...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 06/02/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळपासून मिपाचा सेवादाता गंडतोय. मिपाचा ह्याशी काहीही संबंध नाही. मात्र तरीसुध्दा मिपाकरांची गैरसोय होतेय. त्याबद्दल दिलगीर आहे. तात्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर सेवा देऊ शकत नाही म्हणून स्वतःचीच लाज वाटतेय. डोमेन नेम सर्व्हर आणि मिपाचा डेटाबेस सर्व्हरचा इश्यु आहे. शक्यता आहे की आज रात्री जेव्हा मिपावर गर्दी नसेल तेव्हा ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. तो पर्यंत अडचण येणार नाही. डोमेन नेम सर्व्हरचे काम करतांना कदाचित असं होऊ शकतं की मिपा उघडणार नाही किंवा जुणी पानं उघडली जातील. पण हे थोड्यावेळासाठी असेल. उद्या सकाळपर्यंत सर्व सुरळीत असेल. नीलकांत

असा ही एक भावानुवाद "हो ना गं आई"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 06/02/2009 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हो ना गं आई....." अंधाराची भीती मज वाटे तरी मी ते कुणा न सांगे तुला ही मी ते सांगत नाही कदर तुझी करीतो मी आई माहित आहे तुला सर्व काही हो ना गं आई........ गर्दीमधे मला नको सोडून जाऊं घराकडे आई कसा मी परत येऊं दूर दूर मला नको असा पाठवूं सांग कसा मी तुला मग आठवूं एव्हडा व्रात्य असेन का मी हो का गं आई......... बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी गं आई नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी गं आई नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई गं आई चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी गं आई ठाऊक आहे तुला सर्व काही हो ना गं आई...... नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई नसती क
Taxonomy upgrade extras

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

लेखक दशानन यांनी गुरुवार, 05/02/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत. तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे. स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला admin@mimarathi.net पाठवू शकता. आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत. ५ फेब्रुवारी २००९ पासून हे स्थळ

लफडा

लेखक दशानन यांनी गुरुवार, 05/02/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ? हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे, त्यांची किव करावी शी वाटते, अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना.. पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ? नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :? आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता.. मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली ! मी म्हणालो... असं कसं ?