Skip to main content

तुझा सूर्य मला उसना दे !

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यागता तुझा सूर्य मला उसना दे, खरंय की, तूच वाट चुकलेल्या पान्थस्था सारखा आलास, आशा होती तुला अंधारल्या माळावरच्या मिणमिणत्या कन्दिलाचीच फक्त ...... अरे पण माझ्या कड़े तर सूर्य होता ! अर्थात .. तुला हे ठाऊकच नाही म्हणा. अरे, अनंत कालपटावर स्वतेजाची पखरण करणारा माझा सूर्य ..... तो असंख्य जीवनांचा जनक ! त्या चन्डान्शुच्या प्रखरतेने निथळतानाही वाटे.... त्याचा अनादी जीवनांश तो किरणकरांनी आम्हाला देतोय. अभ्यागता ! पण हां इतिहास झाला. आमचा सूर्यही आता मळल्यासारखा झालाय बघ. वाटते कळिकाळपटाशी झुंजत तो श्रांत झालाय ! त्या हिरण्य गर्भावर चढलीत जळमटे .... आणि .. तिमिराच्या वाटा त्याच्या अंगांगावर पसरताहेत ! म्हणून ..अभ्यागता ! तुझा सूर्य मला उसना दे ! - सागरलहरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1162
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया