Skip to main content

घनगंध

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मुग्ध वेड्या चान्दणिचे , गीत हे हळुवार आहे घाव लेवुन तव स्मृतींचे , मम मनी फुलबाग आहे... हासणारे नेत्र माझे, अश्रुना आव्हान देती आज दाटे या उरी हा, कोंडला नि:श्वास आहे .. माळलेली तू फुले मज, गंधुनी मी धुंद होते, कायेस या अजुनी तुझ्या रे, देहिचा घनगंध आहे .... -- सागरलहरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1147
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

माळलेली तू फुले मज, गंधुनी मी धुंद होते, कायेस या अजुनी तुझ्या रे, देहिचा घनगंध आहे ....सुंदर !