मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

व्यायाम: आय डोन्ट केअर

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
व्यायाम आणि डाएट (विविध प्रकारची) याबद्दल इतक्यांकडून,इतक्यांदा, इतकं लिहिलं गेलंय की आता ही वृद्धा आणखी नवीन काय लिहिणार असं तुम्हांला वाटेल. पण जसा/जशी प्रत्येकजण प्रेमात पडतो/पडते. काहीजणं तर अनेकदा प्रेमात पडतात, आणि त्या प्रत्येकाला आपलं प्रेम वेगळं, नव्या नवलाईचे, नवंकोरं आणि दुसऱ्याला"सांगण्यासारखं"वाटतं तसंच हे आहे. मलाही माझ्या व्यायामाबद्दल नव्यानं सांगावंसं वाटतं. खरं सांगायचं तर मी जन्मभर व्यायाम करत आलेली आहे. पण माझ्या वजनाचा आणि व्यायामाचा फारसा काही संबंध नाही हे माझ्या पक्कं लक्षात आलेलं आहे.

विनिपेग डायरीज-२

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागचा भाग-- विनिपेग डायरीज मागच्या भागात शेवटी समाप्त असे लिहिले होते. पण विचार करता करता असे लक्षात आले की अजूनही सांगण्यासारखे बरेच काही आहे डोक्यात. शिवाय काही वाचकांनी पुढचा भाग टाकायची सूचना केली होतीच. तेव्हा सर्वांचा मान ठेवून हा भाग टंकायला घेतला. तर मीटिंगमध्ये विनिपेगचा मुक्काम हलवण्याचे ठरले आणि माझ्या डोक्यात भराभर चक्रे हलू लागली. आता ऑफिस आणि घर अशा दोन आघाड्यांवर लढाई चालू झाली. जरी विनिपेग ऑफिसात नसलो तरी मला पुढचे काही दिवस रिमोटली इथे सपोर्ट द्यायचा होताच.

भोंगा - मराठी चित्रपट

तर्कवादी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातही गाजत असलेल्या मशिदीवरील भोंगा या विषयाच्या निमित्ताने "भोंगा" या चित्रपटाचा अल्पपरिचय. काही महिन्यांपुर्वी झी ५ अ‍ॅपवर मी हा चित्रपट पाहिला. शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे असे विकीवरुन समजते. चित्रपटाची कथा मशिदीवरील भोंगा, भोंग्यावरुन दिली जाणारी अजान या विषयाभोवती गुंफलेली आहे. पण लेखक/दिग्दर्शकाने चित्रपटाला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला नाही.

अपरिचित पोलो

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते.

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

Trump ·
लेखनप्रकार
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते. मटामधील श्रध्दांजली https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms --------------------------- त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर

निनाद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर सादर करत आहे. १५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जून च्या आसपास - पहिला पाऊस झाला आणि नंतर गुल झाला पाऊस! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जुलै - फार जास्त पाऊस झाला हो, थांबायचे नाव नाही. ३० जुलै - खांदेश-मराठवाडा-विदर्भ - पाऊस न्हयी शे औंदा! येक्दाच पल्डा मंग पाऊस गेला. आता टँकरच बोलवा लागते. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० सप्टेंबर - पाऊस जास्तीच झाला थांबायचे नाव नाही!

वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

पाटिल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी असणार, हे ओघाने आलेच समजा. पण तेव्हा ती तशी नव्हती. ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते. अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती. कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल? तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल? नवीन मित्र चांगले मिळतील का?

ती २५ तारीख

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज २१ तारीख, एप्रील २०२२....अगदी अपक्षाच्याही बरोबर नसताना मला २५ तारीख आठवली. त्या व्यक्तीची आठवण आली त्या २५ तारखेवरुन. २५ जानेवरी आहे ती तारीख हे नंतर लक्षात आल. बाळासाहेब ठाकरे, ह्या व्यक्तीत ती जादु, तो प्रभाव होता की, मला कुठल्यही राजकीय पक्षाशी अगदी अपक्ष म्हणुन निवडणनुकीत रस घेणा-या व्यक्तीशीही दुरचे नाते नसताना ह्या एकाच व्यक्तीबद्दल एवढा जिव्हाळा वाटावा, ह्याचे आश्चर्य वाटले. टीव्हीवरती लहान असताना बघितलेले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर युट्युबच्या सौजन्याने बघितलेले गॉगल व सफेद दाढीत अजुन रुबाबदार, भक्कम दीसणारे बाळासाहेब ठाकरे अजुनही तितकेच माझ्या मनाला भावतात.

हसरे चेहरे

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
जीवनात कितीतरी लोक येतात,जातात.काही आठवणीत रहातात काहींचे विस्मरण होते.काहीच बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती की ज्या चटका लावून जातात.त्यातील काही खुपच महत्वाच्या तर काही अगदीच नगण्य. माणसाच्या स्वभावावर बरेच काही अवलंबून आसते.आशीच आमच्या सोसायटीतील कचरा उचलणारी बाई.कधीच गैरहजर नाही.दुर्मुखलेला,केविलवाणा चेहरा स्वताच्या गरिबीचे रडगाणे कधीच नाही. वेळ ठरलेली,अशिक्षित,एकदाच घंटी वाजवणार,दार उघडताच सुहास्य मुद्रेने "गुडमॉर्निंग "'जरूर म्हणणार.

"मी वसंतराव" च्या निमित्ताने

जे.पी.मॉर्गन ·
लेखनप्रकार
शहर - आपलं नेहेमीचंच स्थळ - guess करायला एकदम सोपं दिवस - मावळलेला workday वेळ - रात्री उशिराची "मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो). पहिला धक्का बसतो तो पार्किंगमध्येच. मोजक्याच गाड्या.