Skip to main content

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर

लेखक निनाद यांनी सोमवार, 09/05/2022 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर सादर करत आहे. १५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जून च्या आसपास - पहिला पाऊस झाला आणि नंतर गुल झाला पाऊस! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जुलै - फार जास्त पाऊस झाला हो, थांबायचे नाव नाही. ३० जुलै - खांदेश-मराठवाडा-विदर्भ - पाऊस न्हयी शे औंदा! येक्दाच पल्डा मंग पाऊस गेला. आता टँकरच बोलवा लागते. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० सप्टेंबर - पाऊस जास्तीच झाला थांबायचे नाव नाही! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ऑक्टोबर - काय भयानक ऊन आहे हे. उन्हाळा बरा असे म्हणायचे वेळ आली. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! डिसेंबर सुरुवात - काय भयानक थंडी आहे! अशी थंडी आधी कधीच नव्हती! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! डिसेंबर शेवट - पाऊस? अरे हे काय पावसाचे दिवस आहेत? आता नवीन ऋतु हिवसाळा वगैरे. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! जानेवारी - काय दाट धुके होते हो? असे धुके कधीच नाही पाहिले. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! मार्च - काय ऊन पडले आहे भयंकर! असे ऊन इतक्या लवकर कधीच नाही पाहिले. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! १५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! घाला भर!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3092
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

वर्षभरात कधीही आणि कायमच :
हल्लीच्या पिढीचं काय खरं नाही हो! आमच्या वेळेला असं नव्हतं........

वर्षभरात कधीही आणि कायमच :
हल्लीच्या पिढीचं काय खरं नाही हो! आमच्या वेळेला असं नव्हतं........
या वाक्याचे पुरावे इसवी सन 1000 पासून मिळाल्याच्या नोंदी आहेत असे मागे एका लेखात वाचले होते.

नोव्हेंबर - थंडीच नाही हो यंदा! आमच्या वेळी दिवाळीत अशी थंडी पडायची की विचारू नका. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

वर्षभरात कधीही आणि कायमच : मिसळ्पाववर आता आधीसारखे दर्जेदार वाचायलाच नसते, केवळ वादविवाद!! आधी असे नव्हते

एक चारोळी, पुण्यात पिकणार भात अन कोकणात पिकणार गहू कधी येईल, किती येईल पावसाचा नेम नाय रे भौ

डिसैंबरात पाऊस झाला. मावा पडला मोहरावर. जळाला. या वेळचे सीएचे पेपर्स कठीण होते. पूर्वीचे मिपा राहिले नाही.

मस्त आहे आवडले ८ जून कवाच गेली, मिरग संपतबी आला पण पावसाचा पत्ता नाय, सारे नक्षत्र बदलले. आबे दिवाळीच्या तोंडावर पाऊस येऊन रायला ना, . हा काय बरसादीचा टाइम हाय. काहीबी होते आजकाल आधी उन्हाऱ्यात लग्न होत नव्हती का. हे उन व्हय का व्हय, आजकाल काही खर नाही भाऊ

लोक काहीही धागे पाडतात.

😆

पूर्वीचे मिपा राहिले नाही. आमच्या वेळेला असं नव्हतं.......

+१

मस्त खुसखुशीत लेखन आवडलं !

समंद हायब्रीड हाय आताची पिढी.