वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)
लेखनप्रकार
नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला.
संदर्भ असा -
'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे. त्याचा ट्रेलर इथे आहे :
या ट्रेलरच्या निमित्ताने २०२१/२२ साली घडलेली जर्मनीतली तशीच घटना वर आली.
ही मूळ केस काय आहे हे या मूळ पिटिशन मधून कळेल.
थोडक्यात झाले असे -
१. एका गुजराती जैन जोडप्याला जर्मनीमध्ये मुलगी झाली.
२. बाळ-बाळंतिणीची काळजी घेण्यासाठी बाळाची आजी जर्मनीला गेली.
३. आजीने बाळाला इजा केली, ते मातापित्यांना सांगितलं नाही.
४. बाळाला दवाखान्यात घेऊन गेल्यावर मातापित्यांना याबाबत खुलासा करता आला नाही म्हणून डॉक्टरांनी मूलसंरक्षण एजन्सीला पाचारण केले, पोलिसात प्रकरण गेलं. मातापित्यांवर लैंगिक अत्याचाराचा ठपका ठेवण्यात आला.
५. बाळाची कस्टडी सरकारने घेतली.
६. गुन्हे अन्वेषणातून बाळावर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नाहीत असे सिद्ध झाले.
७. मूल तरीही अजून सरकारच्या ताब्यातच आहे.
८. मूल मातापित्यांना परत मिळावे म्हणून मातापिता खूप झगडत आहेत.
मी या पिटिशनचे आधीचे व्हर्जन वाचले आहे, मला वाटतं की यात अलीकडे थोडे बदल केले गेले आहेत.
माझ्या मते काही तपशील असे घडले असावेत, आताच्या वर्जनमधून गाळले आहेत.
३. आजीने बाळाला मसाज करताना बाळ आजीच्या हातून निसटलं. आजीने ते लपवून ठेवलं.
४. बाळाला झालेली इजा गंभीर स्वरूपाची होती. शिवाय या इजेचे कारण नीट न सांगता आल्याने डॉक्टरांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार कारवाई केली. इजा गंभीर असल्याशिवाय डॉक्टर असे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. बर्लिनमध्ये असंख्य भारतीयांना मुले झाली आहेत. मला ही वांशिक भेदातून मुद्दाम रचलेली योजना अजिबात वाटत नाही.
५. या घटनेच्या आधीही अशीच एक घटना बाळाच्या बाबत घडली होती. तेव्हा बाळाच्या घरी येणार्या सरकारी अधिकार्यांनी ही घटना किरकोळ स्वरूपाची आहे असा शेरा दिला होता. याच घटनेचा आधार घेऊन मूलसंरक्षण अभिकरणाने माता पित्यांची पूर्ण मानसिक छाननी करावी असे कोर्टात सांगितले.
जर कोर्टात सगळं सुटलं नाही तर बाळाला या मातापित्यांना कायमचे मुकावे लागेल. शिवाय बाळाला एखाद्या जर्मन दाम्पत्याला दत्तकही दिले जाऊ शकते.
माझी मते/अनुभव -
१. भारतीय लोक बाळाच्या बाबतीत आजही टाळू भरणे, धुरी देणे, डोळ्यांत अंजन घालणे, बाळाच्या कानात तेल ओतने, तीट लावणे, मुलाला उलटं पालटं करून आंघोळ घालणे असे अवैज्ञानिक प्रकार का करतात? इथल्या डॉक्टरांनी अनेकवार हे स्पष्ट सांगूनही अनेक शिकली सवरली जोडपीसुद्धा कुटुंबाच्या दबावाखाली येऊन असे अघोरी प्रकार का करतात?
२. माझ्या एका जर्मनीस्थित मित्राने असाच एक व्हिडिओ ग्रुपवर टाकला होता. अगदी वरच्या केसनुसार, त्याच्या नवजात बाळाची आजी बाळाला वरचेवर अलगद पकडून इलेक्ट्रिक शेगडीवर धुरी देत होती. ते पाहून माझ्या डोक्यात तिडिक गेली आणि मी वाईटपणा ओढवून घेतला. जर हा व्हिडिओ जर्मन संस्थांनी पाहिला तर माझ्या मित्रावर गुन्हा दाखल होऊन अतिशय कठोर शिक्षा होऊ शकते.
३. सदर पिटिशन मध्ये भारतीयांना आवाहन आहे. त्यामुळे त्यामध्ये नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. उदा. शाकाहार, जैन संस्कृती वगैरे वगैरे. कायद्यानुसार बाळ सरकारी संस्थेत आहे आणि बाळाची नियमांनुसार काळजी घेतली जात आहे. त्यामध्ये बाळाला पौष्टिक आहार देणे वगैरे गोष्टीसुद्धा आल्या. अर्थातच दिड वर्षाच्या बाळाला संस्कृतीवगैरे काय कळणार? त्याला जसं वाढवू तसे ते वाढेल. पिटिशन मध्ये मात्र यावर उगाच भर दिलेला आढळतो.
४. माझ्या मते, जे काही झालंय ते दुर्दैवी आहे. आई आणि मूलाला असं अजिबात तोडू नये. केवळ याच मानवी मुद्द्यावर सहानुभूती मागावी आणि माझी ती आहे. याहून कोणतीही मोठी मखलाशी गरजेची नाही. परंतू पिटिशनला जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्यात म्हणून असं करणं मी समजू शकतो.
५. आता चित्रपट येऊ घातला आहे त्यामुळे यावर सांस्कृतिक राजकारण केलं जाईलच. उदा. इथलाच एक धागा आठवला. भारतात काय नाही/आहे ते तिकडे नाही असा. त्या धाग्याला हा चित्रपट आणि त्याने उठलेला वाद एक प्रतिसाद ठरेल. बर्याच लोकांनी अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत - आपली शाकाहारी बुद्धिमान बाळे बाटवून जर्मन सरकार जर्मन लोकांची अशी धन जाणीवपूर्वक करत आहे!!
६. परंतू या निमित्ताने देखील भारतीय लोक नेहमीच्या त्वेषाने चवताळून उठून शिव्या देण्याऐवजी आत्मपरीक्षण करतील का? आजही अगदी प्रगत देशांत जाऊनही, विज्ञान तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेऊनही आपण धुरी देण्यासारखे अघोरी प्रकार करत असू तर हे खुपेल का? सुवर्णप्राशन विधींसारख्या गोष्टींनी बाळाला हेवी मेटल खाऊ घालणे, बाळाची सुंता करणे(हा एक उच्च प्रतीचा वायझेडपणा), डॉल्बीच्या दणदणाटात बाळाला बिनधास्त घेऊन नाचणे, टाळू भरण्याची काडीचीही गरज नसताना तसे करणे, बाळाच्या जावळाच्या निमित्ताने बाळाचे डोके धार्मिक स्थानी कुठल्याही सोम्यागोम्या न्हाव्याच्या हस्ते वस्तर्याने भादरणे असले प्रकार जोवर थांबवत नाहीत तोवर त्यांनी संस्कृतीची भलामण करून परदेशी सरकारांना शिव्या घालण्याचा कृतकपणा करू नये.
७. परदेशस्थ भारतीयांनी शक्यतो तिथल्या कायद्यांना, वैद्यांना धरूनच मुलं सांभाळावीत. स्वतः मूल म्हणून आलेले अनुभव सार्वत्रिकच असतील असे नाही. काहीही ग्रांटेड धरू नये.
वरील बाळ लवकरात लवकर तिच्या आईच्या कुशीत जावो हीच सदिच्छा!
वाचने
5741
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वरील चित्रपटाविषयीची सध्याची
नवीनच.
मूळ आशयाशी सहमती.
In reply to मूळ आशयाशी सहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शास्त्रीय अशास्त्रीय भाग फार
In reply to मूळ आशयाशी सहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to मूळ आशयाशी सहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या माहितीप्रमाणे
भारतीय परंपरा हा विषय वेगळा
In reply to भारतीय परंपरा हा विषय वेगळा by गवि
objection sustained
In reply to objection sustained by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इजा गंभीर स्वरूपाची असणे आणि
In reply to objection sustained by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुद्दे दोन्ही आहेत.
In reply to भारतीय परंपरा हा विषय वेगळा by गवि
सरकारी खर्च नाही
इथे परंपरागत बाळांची काळजी घेतली जात होती.
नॉर्वे की जर्मनी ?
आपण राहतो त्या देशाचे
अशी सावजे वकिलांची बेरकी जमात हुडकत असते.
In reply to अशी सावजे वकिलांची बेरकी जमात हुडकत असते. by चित्रगुप्त
एका संकटातून थोडक्यात बचावलो होतो
कल्चरल डिफ्रन्सेस
In reply to कल्चरल डिफ्रन्सेस by तुर्रमखान
तुर्रमखान सहमत ...
सत्यासत्यः चित्रपट
अण्णा आपल्या म्हण्याशी
जैसा देस वैसा भेस अन उरफाटे