जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात. मात्र सर्व अवयव असूनही मने अपुरी असणारे जीवनाचा मतितार्थ शोधण्यास असमर्थ ठरतात. या महापुरात कधी नात्यांचा ओंडका आधाराला येतो तर कधी अविश्वासाचा भोवरा श्वास गुदमरून टाकतो. हे परीक्षेचे क्षण नसतात. ही केवळ जगण्याची तयारी! पुढे एखादा असा टप्पा येतो, की तिथे चक्क महापुराची मजा वाटू लागते. सगळे भेदाभेद जीवन-प्रवाहाने व्यापून टाकलेले, सगळीकडे फक्त आपल्यासारखे जीवन, भावनांची चौफेर इतकी दाटी, की त्यातून वाट शोधताना वाऱ्याची सुद्धा दमछाक व्हावी. आणि आपण मात्र स्तब्ध, निश्चल, प्रवाहापासूनही विरक्त... कदाचित किंचितसे हवेतच! तो जीवनाच्या परीक्षेचा क्षण - सगळ्या लवाजम्याची निरर्थकता पटूनही त्यात अर्थ शोधण्याची आंतरिक ऊर्मी पेटून ती तेवत ठेवण्याची धडपड! या परीक्षेला केवळ सामोरे जाणे हेच परीक्षा पास करण्यासाठी पुरेसे ठरते. प्रश्नांच्या स्वरूपात जीवन कशाने सार्थकी लागणार याचे उत्तर मिळते. जिवंतपणाचे स्वागत आणि मृत्यूचे आभार मानता आले की जीवन सार्थकी लागते.
वाचने
5117
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेमक्या कोणत्या प्रश्नांच्या स्वरूपात उत्तर मिळाले आहे ?
चित्रगुप्त काका.
In reply to नेमक्या कोणत्या प्रश्नांच्या स्वरूपात उत्तर मिळाले आहे ? by चित्रगुप्त
काहीही हं गवि.
In reply to चित्रगुप्त काका. by गवि
सध्या मोबाईलवर बिछान्यावर
जीवनात सध्यातरी कसलेच गहन
प्रश्न म्हणले...
कर्नल साहेब, "मै हूं ना".
In reply to प्रश्न म्हणले... by कर्नलतपस्वी
सुप्पर!!
म्हणजे...
In reply to सुप्पर!! by राजेंद्र मेहेंदळे
आय्याम द यु इन द यु अँड शी इज
In reply to सुप्पर!! by राजेंद्र मेहेंदळे
हेच का ते?
In reply to आय्याम द यु इन द यु अँड शी इज by गवि
हे नाही हो.. सुप्राकाँशसच्या
In reply to हेच का ते? by राजेंद्र मेहेंदळे
अहो,
In reply to हे नाही हो.. सुप्राकाँशसच्या by गवि
अहो, तुम्ही वाचलंय का? :-)
In reply to अहो, by मिसळपाव
वाचलंय? हॅ हॅ हॅ... काय सांगु साहेब...मीच लिहिलंय...
In reply to अहो, by मिसळपाव
हम्म!!
In reply to वाचलंय? हॅ हॅ हॅ... काय सांगु साहेब...मीच लिहिलंय... by टर्मीनेटर
नका शोधू. ते या विश्वात नाही
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
नाही पण तुम्ही एकदा 'इन ट्यून विथ द ट्यून' वाचाच.. पाच रुपये
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
जीवन सार्थकी लावायचे