मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

अरे पुन्हा आयुष्याच्या..

बहुगुणी ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अरूण शौरी इंडियन एक्स्प्रेस मध्ये आपल्या पश्चिम समुद्रकिनार्‍याविषयी लिहितातः Surprised?. आणि टाइम्स मधली ही बातमी आपल्या पूर्व किनार्‍याविषयी.

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

सुनील मोहन ·
लेखनविषय:
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.

माझे सारे जीवन देई मम बाळाला!

कलंत्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळ वर्तमानपत्रातील २ तारखेची बातमी. आपणासर्वांना अशा घटनेबाबत आनंद आणि अभिमानच वाटेल. मॉ तुझे सलाम. सध्या भयंकर अशा अस्थिर वातावरणात आपल्या जीवाची पर्वा न करणारे भारतीय आहेत. बातमी खाली देत आहे. जेरुसलेम, ता. २ - मुंबईतील "नरिमन हाउस'मध्ये अतिरेकी घुसल्यानंतर भीतीने सॅंड्रा सॅम्युएल या "आजी' एका खोलीत घुसल्या. बाहेर मात्र बेछूट गोळीबार सुरू होता. "नरिमन हाउस' हे ज्यू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या "छाबड'चे (धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र) मुख्यालय.

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

इनोबा म्हणे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कृपया हे पाहा - http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl= (कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्‍याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.) मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ.

या १७ अनामिक बळींची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कशी मिळेल?

बहुगुणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या अनामिक आणि बेवारस अवस्थेत मुंबईत शवागारात पडून असलेल्या या अतिरेक्यांच्या १७ बळींचे चेहेरे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कसे पोहोचू शकतील? आणि फक्त याविषयीची बातमी प्रसिद्ध करून मटा का थांबले आहे? त्या वृत्तपत्राला (किंवा नको तेंव्हा investigative journalisitc spirit दाखविणार्‍या वाहिन्यांना) ही छायाचित्रे घेण्यास व प्रसिद्ध करण्यास काही कायद्याच्या अडचणी आहेत काय? मुंबईतील कोणी मिपा कर त्या शवागारात जाऊन त्यांच्या चेहेर्‍यांची छायाचित्रे घेऊन प्रसिद्ध करू शकतील का?

मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला : पाकिस्तानी आढावा

पंकज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पाकिस्तानी दुरचित्रवाहिनीवर घेतलेला आढावा : http://ca.youtube.com/watch?v=6Sn-kV9yR6U&feature=related

ह्या लाजिरवाण्या घरात....

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२/३ दिवस घरी काही कारणामुळे लवकर जात होतो रात्रीचा, त्यामुळे टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो ! परमेश्वरा, अरे काय अर्थहीन आणी महामुर्ख मालीका असतात हो ह्या टि.व्हि. वर. एक मुलगा अपंग, एका मुलाची बायको माहेरच्या श्रीमंतीचा प्रचंड माज असलेली आणी त्याला कयम चुकीचे सल्ले देणारी, मुलगी वेडी आणी हरवलेली, वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला आहे आणी ते कमी कि काय म्हणुन ते तुरुंगवारी सुद्धा करुन आले आहेत येव्हड्यातच. आणी मालीकेचे नाव काय तर म्हणे 'ह्या गोजिरवाण्या घरात'. डोंबलाचे गोजिरवाणे ?

बल "सागर" भारत

विकास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ताच "बलसागर भारत होवो" हे यशोधरा यांचे छानसे संपादकीय आले होते. त्याचा संदर्भ या चर्चेशी अप्रत्यक्ष आहे. पण या चर्चेचे शिर्षक जे आहे त्यात "भारताचे बल आंतर्राष्ट्रीय सागरात" वाढत आहे ह्या बातमी कडे वेधण्यासाठी आहे! निमित्त आहे हिंदी महासागरात विविध ठिकाणी सागरीचाचेगिरी चालते. त्यावर देखरेख करायचे काम प्रामुख्याने (या भागाकरता) भारतावर येते. हाँककाँगच्या "डिलाईट" नामक जहाजाला सोमालीयाच्या सागरीचाच्यांनी वेठीस धरले.

बंदपीठाचा धसका.

कपिल काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात. अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत. एकेका लेखांचे विषय तर पहा. कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले? दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?

काम

निमीत्त मात्र ·
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....